आज सेविका व मदतनिसांचे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:18 AM2017-10-05T01:18:26+5:302017-10-05T01:18:33+5:30
मेहकर : नियमित पगारवाढ व्हावी व इतर मागण्यांसाठी ५ ऑ क्टोबर रोजी मेहकर व लोणार तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : नियमित पगारवाढ व्हावी व इतर मागण्यांसाठी ५ ऑ क्टोबर रोजी मेहकर व लोणार तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
अंगणवाडीसेविका व मदतनिस यांची पगारवाढ व्हावी, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ११ सप्टेंबरपासून संप सुरु आहे. अंगणवाडीसेविका व मदतनिस यांच्या संपाकडे शासन दुर्लक्ष करीत असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी मेहकर व लोणार तालुक्यातील शेकडो सेविका व मदतनिस यांचे मेहकर येथे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात जास्तीत जास्त सेविका व मदतनिस यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयटकचे राज्य कमिटी सदस्य तथा बुलडाणा जिल्हाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड, व. ना. गायकवाड, एस.आर.खोडके, .अलका राऊत यांनी केले आहे.