पुतळा विटंबनाप्रकरणी आज चिखली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:08 AM2017-08-14T00:08:46+5:302017-08-14T00:09:01+5:30

चिखली : स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ाची विटंबना झाल्याच्या घटनेचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, शिवराणा मित्रमंडळ, राजेराणा प्रतिष्ठान, अ.भा. क्षत्रिय महासभा, राजपूत युवा मंच, राजपूत आरक्षण महामोर्चा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराणा प्रताप संस्था आदी पक्ष संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र निषेध नोंदवून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन १२ ऑगस्ट रोजी चिखली पोलीस स्टेशनला दिले असून, या घटनेच्या निषेधार्थ १४ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या चिखली बंद व मोर्चाला पाठिंबादेखील दिला आहे.

Today, the mud clutches are closed | पुतळा विटंबनाप्रकरणी आज चिखली बंद

पुतळा विटंबनाप्रकरणी आज चिखली बंद

Next
ठळक मुद्देराजकीय पक्ष, संघटनांकडून निषेधआरोपीवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ाची विटंबना झाल्याच्या घटनेचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, शिवराणा मित्रमंडळ, राजेराणा प्रतिष्ठान, अ.भा. क्षत्रिय महासभा, राजपूत युवा मंच, राजपूत आरक्षण महामोर्चा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराणा प्रताप संस्था आदी पक्ष संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र निषेध नोंदवून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन १२ ऑगस्ट रोजी चिखली पोलीस स्टेशनला दिले असून, या घटनेच्या निषेधार्थ १४ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या चिखली बंद व मोर्चाला पाठिंबादेखील दिला आहे.
येथील हिंदूसूर्य महाराणा प्रताप पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर समाजातील सर्व स्तरातून निषेध होत आहे. दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पुतळा परिसरास भेट देऊन पाहणी केली व या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवित शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळय़ांच्या सुरक्षेबाबत गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील यांच्यासोबत चर्चा केली व उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी यांना या कृत्यास जबाबदार आरोपीच्या कारवाईबाबत चर्चा केली. दरम्यान, काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, ज्ञानदेव सुरूशे, बिदुसिंग इंगळे यांनी १४ ऑगस्ट रोजीच्या बंदला पाठिंबा दिला आहे. यबाबत भारतीय जनता पार्टीनेदेखील तातडीची बैठक घेऊन प्रदेश कार्यकारीणी सदस्य तथा जि.प. सभापती श्‍वेता महाले यांनी पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी चर्चा करून निषेधाचा ठराव मांडला. या बैठकीला अँड.विजय कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष संजय चेके, सुरेशआप्पा खबुतरे यांची उपस्थिती होती, तर भाजपाच्यावतीने तालुकाध्यक्ष    सुनील पोफळे, संतोष काळे यांनी निवेदन देऊन बंदला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने  संजय गाडेकर, रवींद्र तोडकर, प्रकाश शिंगणे, गुलाबराव खेडेकर यांनी चिखली पोलीस स्टेशनला निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यासह बंदला पाठिंबा दिला आहे. शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने प्रा.नरेंद्र खेडेकर, सखाराम भुतेकर, शिवाजी पवार, रवींद्र सपकाळ यांनी तीव्र निषेध नोंदवून बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनीदेखील निवेदन देऊन निषेध नोंदवित बंदला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्यावतीने तालुका प्रमुख कपिल खेडेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष तथा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता खरात यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यासह बंदला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, क्षत्रिय महासभेचे डॉ.प्रताप परिहार, डॉ.पंढरी इंगळे, उदय राजपूत, राजपूत आरक्षण महामार्चाचे अध्यक्ष अजयसिंग ठाकूर, महाराणा प्रताप संस्था अकोलाचे अध्यक्ष डी.एन.इंगळे, डॉ.अ.द. परिहार, रामदास मोरे यांनीदेखील निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, शहरातील एकूण सर्वच पक्ष, संघटनांसह सर्वच क्षेत्रातून या घटनेच्या निषेधार्थ १४ ऑगस्ट रोजीच्या बंदला पाठिंबा देण्यासह यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे जाहीर केले असल्याने सोमवारी चिखली बंद राहणार आहे. 

Web Title: Today, the mud clutches are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.