आज रावणदहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:29 AM2017-09-30T00:29:39+5:302017-09-30T00:29:47+5:30

बुलडाणा : आश्‍विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा  दसरा म्हणून साजरा केला जातो. देवीच्या घटांची स्थापना  आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचा नवरात्रोत्सव साजरा  केला जातो, तर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात  येतो. या दिवशी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्याची परंपरा  आहे. बुलडाणा अर्बन परिवाराच्यावतीने मागील काही वर्षां पासून रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून,  त्यास शहरवासीयांचा प्रतिसाद मिळत आहे.

Today Ravana Dahan | आज रावणदहन 

आज रावणदहन 

Next
ठळक मुद्देबुलडाणा अर्बन परिवाराचा उपक्रमरा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव सोमवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आश्‍विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा  दसरा म्हणून साजरा केला जातो. देवीच्या घटांची स्थापना  आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचा नवरात्रोत्सव साजरा  केला जातो, तर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात  येतो. या दिवशी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्याची परंपरा  आहे. बुलडाणा अर्बन परिवाराच्यावतीने मागील काही वर्षां पासून रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून,  त्यास शहरवासीयांचा प्रतिसाद मिळत आहे.
दसर्‍याच्या  दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची  पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमी पूजन, अपराजिता  पूजन आणि शस्त्र पूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा  ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन  करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्था पना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर.  त्यानंतर योद्धय़ांनी शस्त्र पूजन, व्यापार्‍यांनी व्यापारासाठी प्रयाण  व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे, अशी प्रथा सांगितली जा ते. 
 या परंपरेला अनुसरून बुलडाणा शहर परिसरात दसरा सण  साजरा केला जातो. बुलडाणा शहराचे कुलदैवत माता जगदंबेला  शमी व आपट्याची पाने अर्पण केल्यानंतर शहरवासी रावण  दहन कार्यक्रमाला हजेरी लावतात.  प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी  रावणाचा वध करून दुष्ट शक्तींवर विजय मिळविला होता. तेव्हा पासून विजयादशमीला प्रतीकात्मक रावणाचे दहन करण्याची  आपल्याकडे परंपरा आहे. त्यानुसार बुलडाणा अर्बन  परिवाराच्यावतीने चिखली मार्गावरील एडेड शाळेच्या प्रांगणावर  विजयादशमीनिमित्त ३0 फूट रावणाचा पुतळा उभारण्यात येणार  असून, सायंकाळी ६.४५ वाजता रावण दहन करण्यात येणार  आहे. यानिमित्त भव्य आतषबाजीदेखील करण्यात येणार आहे.  शहर व परिसरातील तमाम नागरिकांनी रावण दहन कार्यक्रमास  उपस्थिती द्यावी, असे आवाहन बुलडाणा अर्बन परिवाराच्याव तीने करण्यात आले आहे. 

Web Title: Today Ravana Dahan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.