आजपासून सैलानी दर्गा हाेणार दर्शनासाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 12:37 PM2020-11-17T12:37:46+5:302020-11-17T12:38:24+5:30
सैलानी दर्गा दर्शनासाठी १७ नाेव्हेंबरपासून खूला करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सराई : सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले सैलानी दर्गा दर्शनासाठी १७ नाेव्हेंबरपासून खूला करण्यात येणार आहे. कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले असतांना सुरक्षेचा विचार करून शासनाच्या वतीने सर्वच श्रद्धास्थान बंद करण्यात आली हाेती. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुन्हा एकदा राज्यातील मंदिर, मस्जिद, दर्गा, गुरुद्वारा भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
भाविकांना दर्शनासाठी प्रवेश करतांना मात्र शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचा काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेता प्रसंगांनुसार आवश्यक बदल करण्याचे अधिकार ट्रस्ट कडे सुरक्षित आहेत. दर्शनासाठी येतांना तोंडाला मास्क,दुपट्टा चा वापर करावा,भक्तांनी दर्शन घेताना सुरक्षित अंतर ठेवावे, ६५ वर्षावरील व्यक्ती, १० वर्षा खालील बालक व आजारी असलेल्यानी घरीच थांबावे, दर्गा सकाळी ८ ते २ व दुपारी ३ ते ८ भक्तांसाठी दर्शनासाठी खुली राहणार आहे. प्रसाद पवित्र पाणी शिपडण्यास बंदी असुन दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आजाराची काही लक्षणे आढळल्यास राष्ट्रीय अथवा जिल्हा हेल्पलाइन ला त्वरित संपर्क करावा अश्या सुचना ट्रस्टच्या वतीने देण्यात आल्या आहेत.