४३ ग्रामपंचायतींच्या लढतीचे चित्र आज ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:28 AM2021-01-04T04:28:33+5:302021-01-04T04:28:33+5:30
खरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात एकूण ८० ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायतींची मुदत संपल्यामुळे प्रशासक नियुक्त ग्रामपंचायतीची निवडणूक ...
खरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात एकूण ८० ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायतींची मुदत संपल्यामुळे प्रशासक नियुक्त ग्रामपंचायतीची निवडणूक प्रस्तावित आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ९६८ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. तहसीलदार तथा तालुका निवणूक अधिकारी सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर गुरुवारी रोजी तहसील कार्यालयात नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवार व प्रतिनिधीच्या समोर छाननीची प्रक्रिया पूर्ण केली.
भोसा येथील १५, खामगाव १८, हनवतखेड १६, वाघोरा १५, महारखेड २८, डावरगाव १६, धांदरवाडी १९, दत्तापूर १९, वसंतनगर २२, नाईकनगर १६, किनगावराजा ४२, जळगाव २३, पिंपळगाव लेंडी २२, पिंपळखुटा २४, विझोरा २०, पिंपळखेड बु . २४, गारखेड १५, चिंचोली जहागीर १४, सुलजगाव २१, वडाळी १८, दुसरबीड ७५, राहेरी बुद्रूक २७, पळसखेड चक्का १४, मलकापूर ५०, देऊळगाव कोळ ३३, कुंबेफळ २५, कोनाटी १२, ढोरवी १८, पोफळ शिवणी १३ , शेंदुर्जन ३९, हनवतखेड (मलकापूर पांग्रा) २०, हिवरा गडलिंग ७, आंबेवाडी ७, कंडारी ७, भंडारी ९, सायाळा १०, जागदरी ३०, राजेगाव प्राप्त व मंजूर अर्ज २२, साखरखेर्डा प्राप्त अर्ज ६५ नामंजूर ७ व मंजूर अर्ज ५८, लिंगा प्राप्त अर्ज ११ मंजूर ११, गोरेगाव प्राप्त व मंजूर अर्ज २१, उमनगाव प्राप्त अर्ज १७, नामंजूर १ व मंजूर अर्ज १६, याप्रमाणे तालुक्यात एकूण प्राप्त ९९२ अर्ज होते. त्यापैकी २४ अर्ज नामंजूर झाले आहेत, तर मंजूर अर्जाची संख्या ९६८ एवढी आहे.
प्रशासन सज्ज
निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉ.अस्मा मुजावर, नायब तहसीलदार प्रवीण लटके यांच्यासह पंकज मगर , संदीप बंगाळे, विस्तार अधिकारी बी. डी. घुगे, यू. ए. म्हस्के, शिवाजी पापुलवाड, के. आर. सोंळकी, एस. एस. उबाळे, जी. बी. बोरे, आर. आर. कहाळे तसेच निवणूक विभागाचे कर्मचारी गजानन राऊत, विवेक जगताप, कुलकर्णी, सुहास जोशी, गणेश देशमुख, जनकीराम शिंपे, पुरुषोत्तम हांडे, ताठे, आटोळे आदींनी योग्य नियोजन करीत छाननीची प्रक्रिया सुरळीत पार पाडली.