आज ‘श्रीं’चा १0६ वा पुण्यतिथी महोत्सव
By admin | Published: September 6, 2016 02:06 AM2016-09-06T02:06:53+5:302016-09-06T02:06:53+5:30
सोमवारी रात्री उशिरापर्यंंत एकूण ३५८ भजनी दिंड्याचे आगमन शेगावात झाले.
शेगाव (जि. बुलडाणा), दि. ५ : श्री गजानन महाराजांचा १0६ वा पुण्यतिथी उत्सव मंगळवारी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. यानिमित्त मोठय़ा संख्येने भाविक सोमवारीच शेगावात दाखल झाले आहेत. पुण्यतिथीदिनी हभप विष्णूबुवा कव्हळेकर यांचे सकाळी ७ ते ९ वाजे दरम्यान श्रींचे समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी १0 वाजता यागाची पूर्णाहूती व दु. २ वा. श्रींच्या पालखीची नगरपरिक्रमा सुरु होणार आहे.
या उत्सवाच्या अनुषंगाने सोमवारी रात्री उशिरापर्यंंंत एकूण ३५८ भजनी दिंड्याचे आगमन शेगावात झाले, तर एकूण ५00 दिंड्यांचे आगमन पुण्यतिथी दिनानिमित्त होणार आहे. यामध्ये ६0 भजनी दिंड्या नवीन आहेत. नियमाची पूर्तता करणार्या भजनी दिंड्यांना भजनी साहित्य वाटप करण्यात येत आहे.
बुधवारी हभप जगन्नाथ बुवा म्हस्के मुंबई यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होईल. यानंतर दहीहंडी व गोपाळकाला होईल. उत्सवानिमित्त भक्तांची गर्दी लक्षात घेता संस्थानच्यावतीने सर्व सोयीची व्यवस्था केली असून सेवाधारी आपली सेवा देत आहेत. श्रींच्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.