बाजार समितीत टोकनची हेराफेरी!
By admin | Published: March 6, 2017 01:50 AM2017-03-06T01:50:13+5:302017-03-06T01:50:13+5:30
एका टोकनवर दुस-या ट्रॅक्टरचा नंबर.
मलकापूर, दि. ५-येथील बाजार समितीत शेतकरी टोकन क्रमांकानुसार तूर विक्री होण्याची प्रतीक्षा करीत असतानाच बाजार समितीतील ह्यअह्णपारदर्शकता प्रकर्षाने समोर आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी बाजार समितीतील ही बदमाशी उघडकीस आणली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती बेलाड यार्डात नाफेड अंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरू आहे. नाफेड अंतर्गत खरेदीत तूर उत्पादक शेतकर्यांना व्यापार्यांपेक्षा अधिक भाव मिळत असल्याने तुरीची आवकही मोठय़ा प्रमाणात वाढली. कधी गोदाम, तरी कधी बारदाना, अशी समस्या दर्शवित तूर खरेदी थांबवली जाते. तरीही १५ ते २0 दिवसांपासून तूर खरेदी होईलच, अशा आशेवर प्रतीक्षा करणार्या शेतकर्यांची संख्या मोठी आहे. याच प्रतीक्षेत रात्र काढीत असताना रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जवळपास तुरीची १00 पोती भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह बाजार समितीत आले. एमएच२६-८२५३ हे ट्रॅक्टर कुणाचे ? एवढय़ा पहाटे कसे काय आले? या बाबीला हेरत काही सजग शेतकरी या ट्रॅक्टरकडे आले व चालकास विचारणा केली असता त्याची भंबेरी उडाली. त्यातच या ट्रॅक्टरवर ८२३ क्रमांकाचे टोकन कसे? या टोकनचे ट्रॅक्टर तर अभिषेक राजकुमार रा.कुर्हा यांचे असून, गत आठ दिवसांपासून बाजार समितीत उभे आहे. त्या एमएच१९-१९६५ ट्रॅक्टरचे टोकन या ट्रॅक्टरवर कसे? ही बाब समोर येताच शेतकरी अँड.प्रभाकर म्हैसागर, प्रकाश बोरसे, अनंता महाजन, अरूण पाटील, गुणवंत मालवाडे, सागर वानखेडे, देवीदास इंगळे, नवृत्ती डाहाके, रामेश्वर बेलदार, रामदास बगाडे, रामहरी भगत आदींनी हटकत आक्रमकता दाखवली असता, एमएच २६-८२५३ चा चालक ट्रॅक्टर सोडून अंधाराचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाला.
दरम्यान, ही बाब शेतकर्यांनी शहर पोलीस स्टेशन, बाजार समितीचे सचिव राधेश्याम शर्मा यांना कळविली. सर्वांंंंनी घटनास्थळ गाठत ट्रॅक्टर मालकाचा ट्रॅक्टरवरील मोबाइल नंबरवरून शोध घेतला असता, मालक अकोला येथे असल्याचे कळले. पोलिसांनी पंचनामा केला, पण सुटीचा दिवस असल्याने बाजार समिती यंत्रणेने मात्र याप्रकरणी कारवाई करण्यास असर्मथता दर्शविली. यावरूनच येथील पारदर्शकता रविवारी स्पष्ट झाली.