उद्या १३ जून रोजी ‘श्रीं’ ची पालखी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान करणार

By विवेक चांदुरकर | Published: June 12, 2024 04:38 PM2024-06-12T16:38:46+5:302024-06-12T16:39:30+5:30

पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५५ वे वर्ष आहे.

Tomorrow the Gajanan maharaj palkhi will leave for Pandharpur Wari | उद्या १३ जून रोजी ‘श्रीं’ ची पालखी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान करणार

उद्या १३ जून रोजी ‘श्रीं’ ची पालखी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान करणार

शेगाव : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात दरवर्षी ‘श्रीं’ची पालखी सहभागी होते. परंपरेनुसार यंदाही श्रीसंत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींची पालखी ज्येष्ठ शु.७ म्हणजेच १३ जून रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान करणार आहे.  

पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५५ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, हरीनामाच्या गजरात ‘जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल’ नामाचा जप करीत संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. एकादशीला भूवैकुंठ पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी अशा चार एकादशीला पंढरपूरला भरते. श्रीसंत गजानन महाराजांच्या पुनीत वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून गौरविल्या जाते. येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखविलेल्या मार्गावर गेल्या ५५ वर्षांपासून अव्याहतपणे जपली जात आहे. १३ जून रोजी महाराजांची पालखी विठूरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे. टाळ, मृदंग वाजत,गाजत शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरी नामाचा गजर करीत श्रींच्या पालखीसह पंढरीची वाट धरतात.

श्रींच्या दिडीमध्ये,पताकाधारी, गायक, मुंदगवादक, सेवेकरी अशा एकूण सातशे जणांचा समावेश असतो. या दिंडीमध्ये एक विणेकरी व स्वयंशिस्तीने टाळकरी व पताकाधारी चालत असतात. मार्गावरील अनेक छोट्या-मोठ्या गावांना आनंदात सहभागी होण्याचे भाग्य मिळते. दिवसभर वारी आणि रात्रीचा मुक्काम असतो. मुक्कामाचे दिवस आणि गावे ठरलेली असतात. मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी काकडा, हरीपाठ, रस्त्याने भजन, श्रीची आरती, प्रवचन आदी कार्यक्रम नित्य नियमाने रोज होतात.

स्वागत, वारी करणारा व ते स्वागत पाहणारे भक्तही भारावून जातात. मुखी संताचे अभंग गात पाउले श्रद्धेने पंढरीकडे चालत असतात. पाऊस असो वा ऊन, वारा अथवा थंडी असो, चालताना विठ्ठल दर्शनाची ऊर्जा वारकऱ्यांना पुरेशी असते. प्रत्यक्ष श्रीसंत गजानन महाराजांची पालखी सोबत असल्याने जणू सर्व सुखाचे आगर सोबत असल्याची भावना असते. तब्बल ३३ दिवसांचा पायी करून श्रींची पालखी आषाढ शु.९ म्हणजे १५ जुलै रोजी सोमवारी पंढरपुरी पोहोचणार आहे.

Web Title: Tomorrow the Gajanan maharaj palkhi will leave for Pandharpur Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.