‘श्रीं’चा उद्या पुण्यतिथी सोहळा
By Admin | Published: September 5, 2016 12:59 AM2016-09-05T00:59:12+5:302016-09-05T00:59:12+5:30
शेगावात ९५ दिंड्यांचे आगमन, पुण्यतिथी सोहळय़ाची तयारी पुर्ण.
शेगाव (जि.बुलडाणा), दि. ४ : श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव ६ सप्टेंबर रोजी येथे भाविकांच्या मांदियाळीत साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने संस्थानने जय्यत तयारी पूर्ण केली आहे. ४ सप्टेंबरपर्यंंत ९५ दिंड्यांचे आगमन शेगाव येथे झाले आहे.
शेगाव येथे श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळय़ाला श्री गणेश याग व वरुण यागाने शुक्रवारी प्रारंभ झाला. या सोहळ्य़ातील मुख्य पुण्यतिथी कार्यक्रम ६ सप्टेंबर रोजी होणार असून सकाळी १0 वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान होईल. यावेळी संस्थानचे विश्वस्त यांची उपस्थिती राहील. तसेच कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत पूर्णाहुती कार्यक्रम पार पडणार आहे. दु.२ वाजता श्रींच्या रजत मुखवट्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतरह्यश्रींह्णची पालखी रथ, मेणा, गज अश्वासह नगर परिक्रमेसाठी निघणार आहे. श्रींच्या उत्सवासाठी ४ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत ९५ दिंड्यांचे आगमन झाले आहे. यापैकी नियमांची पूर्तता करणार्या ४२ दिंड्यांना भजनी सािहत्याचे वाटप करण्यात आले आहे.
श्रींच्या मंदिरात गर्दी लक्षात घेता भक्तांच्या पादत्राणे ठेवण्याची वेगळी व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे तसेच नागपूर येथील श्री गजानन भक्त मंडळाने मंदिरासमोर पादत्राणे ठेवण्यासासाठी विनामूल्य व्यवस्थासुद्धा आहे. श्री गजानन भक्तांसाठी श्री अग्रसेन भवन येथे ५ व ६ सप्टेंबर असे दोन दिवस महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. मंदिरात दर्शनासाठी एकेरी मार्गाची व्यवस्था केली आहे. दर्शन लवकर व्हावे यासाठी श्रींच्या भक्तांना श्रींचे कळसदर्शन, मुख्य दर्शन व समाधी दर्शन घेता येणार आहे. भक्तांच्या सेवेसाठी कर्मचारी, सेवाधारी वर्ग तत्पर आहेत.
असा राहील नगर परिक्रमेचा मार्ग
श्री गजानन महाराज मंदिरातून ढोलपुरी गेट, श्री गजानन चित्र मंदिर, जुने महादेव मंदिर, शीतलनाथ महाराज धर्मशाळा, माळीपुरा, प्रगटस्थळ येथे श्रीची प्रगटस्थळी पूजा व त्यानंतर. गढीजवळून डॉ. तायडे यांचा दवाखाना, बाजार रोडने बसस्टँड, मुख्य रोडवरून शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, भक्तनिवास येथून श्रींच्या मंदिरात संध्याकाळी दाखल होईल व या ठिकाणी संस्थानच्या वतीने श्रींची आरती होईल.