विष प्यायला, रुग्णालयात आणलं पण उपचार न करताच निघून गेला
By अनिल गवई | Updated: May 20, 2024 17:00 IST2024-05-20T16:53:58+5:302024-05-20T17:00:14+5:30
विषारी द्रव्य प्राशन केल्याने खामगाव तालुक्यातल बोथा येथील शरद पवन पायघन १९ या युवकाची प्रकृती खालावली.

विष प्यायला, रुग्णालयात आणलं पण उपचार न करताच निघून गेला
खामगाव: विष प्राशनानंतर उपचारासाठी दाखल असलेला एक युवक उपचार न करताच निघून गेला. हा धक्कादायक प्रकार सामान्य रूग्णालयात सोमवारी उजेडात आला.
प्राप्त माहितीनुसार, विषारी द्रव्य प्राशन केल्याने खामगाव तालुक्यातल बोथा येथील शरद पवन पायघन १९ या युवकाची प्रकृती खालावली. हा प्रकार लक्षात येताच, नातेवाईकांनी त्याला रविवारी सायंकाळी ७ वाजता खामगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. काही वेळाने युवक हा उपचार न करताच सामान्य रूग्णालयातून निघून गेला. या घटनेमुळे सामान्य रूग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. रूग्णालय प्रशासनाकडून याबाबत शहर पोलीसांना माहिती देण्यात आल्याचे सामान्य रूग्णालयातील सुत्रांनी सांगितले. या युवकाने विषारी द्रव्य का प्राशन केले, याचे निश्चित कारण समजू शकले नाही.