मोताळा येथे किमान आधार भावाने तूर खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 02:04 PM2018-02-05T14:04:45+5:302018-02-05T14:05:36+5:30
मोताळा : पणन हंगाम २०१७-१८ वर्षासाठी मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात किमान आधार भावाने तुर खरेदीचा शुभारंभ आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचेहस्ते काटापूजन करून ३ फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात आला.
मोताळा : पणन हंगाम २०१७-१८ वर्षासाठी मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात किमान आधार भावाने तुर खरेदीचा शुभारंभ आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचेहस्ते काटापूजन करून ३ फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संस्था बुलडाणाचे अध्यक्ष नंदुभाऊ खडके हे होते. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये अनिल खाकरे पाटील ता.अध्यक्ष, अॅड.गणेशसिंग राजपूत, नंदुभाऊ खडके, उखाभाऊ चव्हाण, गणेशराव पाटील, शरदचंद्र पाटील, अनंतराव देशमुख, महेंद्र गवई, नानाभाऊ देशमुख, सलीमबाबा, निलेश जाधव, सलीम ठेकेदार, डॉ.भरत सपकाळ, सुरेश खर्चे, निना इंगळे, अरविंद पाटील, प्रवीण पाटील, इरफान पठाण, प्रकाश बस्सी, अशोक पाटील, आवटे, निळकंठ खर्चे, कैलास गवई, रामदास हरमकार, विश्वनाथ साबे, सुरेश फाटे, विलास पाटील, खरेदी विक्रीचे सचिन अंभोेरे यांच्यासह कृउबा समितीचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.