दहा लाखासाठी विवाहितेचा छळ, विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:58+5:302021-04-05T04:30:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोणगाव : येथून जवळच असलेल्या असलेल्या ग्राम बेलगाव येथील एका विवाहितेला माहेरून जेसीबीसाठी १० लाख रुपये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : येथून जवळच असलेल्या असलेल्या ग्राम बेलगाव येथील एका विवाहितेला माहेरून जेसीबीसाठी १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. सासरच्या मंडळीची अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३ एप्रिल रोजी घडली. विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सासरच्या मंडळी विरोधात कारवाईसाठी तिच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या दिला. त्यामुळे डोणगाव येथे एकच खळबळ उडाली.
बेलगाव येथील गजानन बालाजी वानखेडे याचे लग्न रिसोड तालुक्यातील मांगूळ झनक येथील प्रतीक्षा जुनघरे हिच्याशी २७ डिसेंबर २०२० झाले. लग्नानंतर विवाहिता सासरी नांदावयास आली. सुरूवातीचे काही दिवस चांगले वागविल्यानंतर गजानन वानखेडे आणि त्याच्या नातेवाईकांनी जेसीबी घेण्यासाठी प्रतीक्षाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरकडील मंडळीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर प्रतीक्षाने ३ एप्रिल रोजी बेलगाव येथे पॐाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती तिच्या वडिलांना समजताच, रामकिसन श्रीपत जुनघरे डोणगाव पोलिसांत आपल्या मुलीच्या मृत्यूस सासरची मंडळी जबादार असल्याची तक्रार दिली. तसेच आरोपींवर कारवाई होईपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर डोणगाव पोलिसांनी पती गजानन बालाजी वानखेडे, सासरा बालाजी साहेबराव वानखेडे, सासू मंदोदरी बालाजी वानखेडे, नणंद मनीषा रामेश्वर बोडखे. नंणद अश्विनी सोमेश बाजड यांच्या विरूद्ध डोणगांव पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३०४ (ब)२. ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट...
नातेवाईक धडकले पोलीस ठाण्यात
प्रतीक्षाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करीत नातेवाईक पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यामवार यांनी डोणगांव पोलीस स्टेशन गाठून नातेवाईक यांची समजूत घातली.