तोताराम कायंदे यांचा अमृतमहोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:18+5:302021-09-22T04:38:18+5:30
तोतारामजी कायंदे यांची सन १९८० पासून बुलडाणा जिल्ह्यातील समाजकारण, शिक्षण तसेच राजकारणात कायमच महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांच्या आमदारकीच्या ...
तोतारामजी कायंदे यांची सन १९८० पासून बुलडाणा जिल्ह्यातील समाजकारण, शिक्षण तसेच राजकारणात कायमच महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात तयार झालेले अनेक युवा कार्यकर्ते सद्यस्थितीत राजकारणात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या बजावत आहेत. राजकारणात नैतिक मूल्य बाळगण्याचे भान हल्ली दिसत नाही. अशा स्थितीत ही राजकारण आणि समाजकारणाची उत्तम सांगड घालून वाटचाल केल्यास समाजाला एक वेगळी दिशा मिळू शकते. याचे उत्तम उदाहरण तोताराम कायंदे आहे, अशा भावना या वेळी प्रकट झाल्या. सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य तसेच त्यांच्या आशीर्वादामुळेच आरोग्य ठणठणीत असल्याचे तसेच यापुढेही समाजातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कार्य करीत राहणार असल्याच्या भावना कायंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या. या वेळी डॉ. सुनील कायंदे, शिवराज कायंदे कुटुंबीय तसेच गजेंद्र देशमुख, वैभव देशमुख, आत्माराम शेळके, प्रकाश गिते, पाटीलबुवा आंधळे, टी.एन.मोगल, पांडुरंग जायभाये, गणेशराव राजे, अंबादास मुंढे, प्रभाकर काकड, कैलास डोडिया, दिनकरराव सोनुने, काकड, रमेश सानप, वैभव देशमुख, वसंतराव उदावंत, बाळासाहेब भोसले, सुभाष राजे ,बबनराव घुगे, अविनाश चव्हाण ,अनिल बुधवत, गजानन घुले, राजेंद्र आढाव यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.(वा़ प्र.)