कुष्ठरोग निर्मुलनासाठी आजपासून ‘स्पर्श मोहीम’
By admin | Published: January 30, 2017 03:28 AM2017-01-30T03:28:48+5:302017-01-30T03:28:48+5:30
बुलडाणा जिल्ह्यात १३५ कुष्ठरूग्णांची नोंद
ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. २९- जिल्ह्यात १३५ कुष्ठरुग्णांची संख्या असून, त्यामध्ये ७८ पुरुष, ४९ महिला व आठ बालरुग्णांचा सामावेश आहे. या सर्व रुग्णांवर औषध उपचार करण्यात येत असून कुष्ठरोगाच्र्या समुळ उच्चाटनासाठी जिल्ह्यात ३0 जानेवारीपासून ह्यस्पर्श मोहीमह्ण सुरु करण्यात येणार आहे.
कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता, नाकाची अंतत्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता पायाची बोटे वाकडी होतात किंवा गळून पडतात. हात पाय विद्रूप होणे हे या रोगात प्रामुख्याने आढळते. पूर्वी १0 हजार लोकसंख्येमागे ६७ कुष्ठरोगी आढळून येत होते. कुष्ठरोग्यांचे हे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाला यश मिळत आहे. आता जिल्ह्यात १३५ कुष्ठरोगी असून हे प्रमाण 0.४६ टक्के म्हणजे २0 हजार लोकसंख्येमागे १ पेक्षाही कमी आहे. अलीकडच्या नोंदिनुसार शहरी भागात ५६ तर ग्रामीण भागात ७९ रुग्ण आहेत. त्यामध्ये ४९ महिला व बारा वर्षाच्या आतील आठ बाल रुग्णांचा सामावेश आहे. बुलडाणा तालुक्यात १५ रुग्ण, चिखली तालुक्यात १0 रुग्ण, देऊळगावराजा ६ रुग्ण, जळगाव जामोद १0 रुग्ण, खामगाव १५ रुग्ण, लोणार ४ रुग्ण, मलकापूर ११ रुग्ण, मेहकर २0 रुग्ण, मोताळा ९ रुग्ण, नांदुरा १२ रुग्ण, संग्रामपुर ७ रुग्ण, शेगांव १३ रुग्ण आणि सिंदखेडराजा तालुक्यात ३ कृष्ठरोग रुग्ण आहेत. कुष्ठरोग समुळ नष्ट करण्यासाठी व कुष्ठरोगाची भिती घालविण्यासाठी जिल्ह्यात स्पर्श मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आज कुष्ठरोग निवारण दिन
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीबरोबरच कुष्ठरोगांच्या सेवेला महत्वाचे स्थान देऊन कुष्ठरोग निर्मुलन कार्यात मोठे योगदान दिले. ३0 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतीथी आहे. हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कुष्ठरोग निवारण दिनापासून जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने स्पर्श मोहिम बरोबरच विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
सर्वेक्षण होणार !
६ ते १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील गावोगावी कुष्ठरुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील १0 दिवस उपचार केले जाणार आहेत.
- जिल्ह्यात १३५ कुष्ठरोगी असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जातात. कुष्ठरोग सहा महिन्यात बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.
-डॉ.के. एस. वासनिक,
सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग, बुलडाणा.