सावळी गावाची काेराेनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:33 AM2021-05-15T04:33:25+5:302021-05-15T04:33:25+5:30
रुईखेड (मयंबा) : काेराेनाची दुसरी लाट शहरांबराेबर ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात पसरत आहे़ गावांमध्ये काेराेना रुग्ण वाढत असल्याने ...
रुईखेड (मयंबा) : काेराेनाची दुसरी लाट शहरांबराेबर ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात पसरत आहे़ गावांमध्ये काेराेना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत आहे़ बुलडाणा तालुक्यातील सावळी येथे वर्षभरापासून विविध उपाययाेजना केल्याने गावाची काेराेनामुक्ती वाटचाल सुरू आहे़ गावात वर्षभरात केवळ ३५ काेराेनाबाधित आढळले आहेत़ तसेच बंदचे आवाहन करताच स्वयंस्फूर्तीने त्याचे पालन करण्यात येते़ अनाेळखी लाेकांना गावात प्रवेश देण्यात येत नाही़ ग्रामस्थांनी राबविलेल्या उपाययाेजनांमुळे गावातील काेराेना रुग्णांची संख्या घटली आहे़
गत काही दिवसांपासून चांडोळ, रूईखेड मायंबा, कुंबेफळ, करडी, म्हसला या गावांमध्ये काेराेनाचा उद्रेक झाला आहे़ शेकडाे रुग्ण या गावांमध्ये आहेत़ दुसरीकडे याच गावांना लागून असलेल्या सावळी गावाची मात्र, काेराेनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे़ गेल्या वर्षभरामध्ये या तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये केवळ ३५ रुग्ण आढळले़ शिवाय वर्षभरात एक मृत्यू झाला आहे व ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवतात. विनाकारण कोणी घराबाहेर पडत नाहीत़ कुण्या पाहुण्याला गावात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळेच इथली परिस्थिती इतर गावांपेक्षा चांगली आहे. ग्रामपंचायत आणि गावकरी मिळून सर्वजण सकाळ, संध्याकाळ शासनाने घालून दिलेल्या संपूर्ण निदेशांचे पालन कसे करावे, संक्रमण काळात कोणकोणती खबरदारी घ्यावी, ही संपूर्ण माहिती ग्रामस्थांना समजावून सांगतात़ गावकरीही त्याला चांगला प्रतिसाद देत आहे़ त्याचा परिणाम म्हणून बाजूच्या गावांमध्ये काेराेनाचा उद्रेक सुरू असताना सावळी गावाची काेराेनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे़
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आम्ही जसे शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश पाळतो, तसे सर्व जनतेने पळून कोरोनाचा सामना करावा़; तरच आपण सुरक्षित राहू़
- डॉ़ तेजराव नरवाडे
सरपंच, ग्रामपंचायत सावळी
आम्ही सर्व सावळी ग्रामवासी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतो़
- प्रल्हाद वाघ
ग्रामस्थ सावळी
सावळी ग्रामस्थ आरोग्याच्या दृष्टीने चांगली खबरदारी घेत आहेत़ आम्ही सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करतात़ तसेच परिसरातील जनतेनेसुद्धा सावळी गावचा आदर्श घ्यावा़
रंजना देशमुख/ मोहिते
आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, चंडोळ