टोईंग वाहनाची दूचाकीस धडक; दोन ठार, कार, मोटारसायकल जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 06:15 PM2019-04-10T18:15:01+5:302019-04-10T18:16:57+5:30

वडनेर भोलजी ता. नांदुरा :  राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर काटी फाट्यानजीक टोईंग वाहनाने उडविल्याने मोटारसायकलस्वार दोन युवक जागिच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता घडली.

Towing vehicle hit motarcycle; Two killed, car, motorcycle burned | टोईंग वाहनाची दूचाकीस धडक; दोन ठार, कार, मोटारसायकल जळून खाक 

टोईंग वाहनाची दूचाकीस धडक; दोन ठार, कार, मोटारसायकल जळून खाक 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वडनेर भोलजी ता. नांदुरा :  राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर काटी फाट्यानजीक टोईंग वाहनाने उडविल्याने मोटारसायकलस्वार दोन युवक जागिच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता घडली. अपघातानंतर टोईंग वाहन चालकाने मोटारसायकल अडकलेल्या स्थितीत पळून जाण्यचा प्रयत्न केला. मात्र दीड किलोमिटर अंतरावर स्फोट होवून तिन्ही वाहने जळून खाक झाली. 
नांदुरा तालुक्यातील काटी येथील शुभम भगवान हिवाळे (वय २०)  हा युवक आजारी असल्याने मलकापूर येथे मोटारसायकलने दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. तो औषधोपचार घेवून परत येत होता. दरम्यान धानोरा फाट्यावर त्याच्या गावातील ज्ञानदेव इंगळे (वय ४२) यांना त्याने सोबत घेतले. थोड्याच अंतरावर गेल्या नांदुराकडून मलकापूरच्या दिशेने जाणाºया टोर्इंग वाहन क्रमांक एमएच०४- डिडी ६५९७ ने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. धडकेने दोघेही रस्त्याच्या खाली फेकले गेले व मोटारसायकल टोर्इंग वाहनाच्या खाली अडकली. तशाच स्थितीत वाहन चालकाने तब्बल दिड कि.मी. पर्यंत मोटारसायकल फरपटत नेली. वाहनामधील घर्षणाने वाहनाने पेट घेतला. तेव्हा टोईंग वाहन चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा  वाहन चालकास धानोरा येथील भावेश गावंडे, अनंता कोल्हे, सुरेश वानखडे, अनंत चोपडे ह्या युवकांनी पाठलाग करून पकडले व पोलिसांना तत्काळ माहिती दिली. मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार चंद्रकांत जायभाये व पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहन चालकास युवकांकडून ताब्यात घेतले व वाहतुक सुरळीत केली.  

दृष्टीक्षेपात अपघाताची भीषणता 
वाहनाची धडक एवढी भीषण होती की दोघे मोटारसायकल स्वार रोडवरून तब्बल ५० ते ६० फुट दूर फेकल्या गेले. यामध्ये शुभम याचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानदेव ंगळे यास उमेश मोल्हळकर, सचिन नरवाडे, मुन्ना पाटील यांनी मनिष टाकर्डे यांच्या खाजगी वाहनातून मलकापुरकडे उपचारार्थ रवाना केले. परंतु उपचारापुर्वीच ज्ञानदेव इंगळे यांचीही प्राणज्योत मालवली.

सदर टोर्इंग वाहन चालक हा अमरावती येथील असून एक बिघाड झालेले चार चाकी वाहन टोचन करून जळगाव खा. कडे जात होता. सदर चालकास युवकांनी पकडले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. आता काटी येथील दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असणाºया सदर वाहनचालकावर पोलीस काय कारवाई  करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Towing vehicle hit motarcycle; Two killed, car, motorcycle burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.