कापूस भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:13 PM2021-01-20T12:13:39+5:302021-01-20T12:13:46+5:30

Cotton Purchase News वाढलेल्या दराचा फायदा खरेदी करणा-या व्यापाऱ्यांनाच होणार आहे.  

Traders benefit from cotton price hike | कापूस भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच

कापूस भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सीसीआयने कापसाची खरेदी सुरू केली. मात्र, बोंडसड व बोंडअळीने कापसाची प्रत घसरल्यामुळे कापसाला भाव कमी मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री केली. व्यापाऱ्यांनी सुरुवातीला कापूस निघाल्यावर कमी भावात खरेदी केला.    व्यापाऱ्यांनी गावातून ५३०० रुपयांपासून कापसाची खरेदी केली आहे. आता कापसाला ५६०० ते ५७०० रुपये भाव मिळत आहे. आता क्विंटलमागे ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे वाढलेल्या दराचा फायदा खरेदी करणा-या व्यापाऱ्यांनाच होणार आहे.  
   प्रारंभी खुल्या बाजारात कापसाचे दर ५४०० ते ५५०० रुपये क्विंटल होते. आता कापसाचा दर ५७०० रुपये क्विंटल झाला  आहे.  काही ठिकाणी चांगल्या कापसाला ५९०० रूपये दरही मिळत आहे. त्यामुळे शासकीय केंद्रांकडे  शेतकर्यांनी पाठ फिरविली आहे. 
 . दरवर्षी १५ जानेवारीनंतर कापसाच्या दरात घसरण होते. यावर्षी मात्र उलटे चित्र आहे. १५ जानेवारीनंतर कापूस घसरेल आणि वाढत्या उन्हाचाही वजनावर परिणाम होईल, यामुळे शेतक-यांनी १५ जानेवारीपूर्वीच मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री केली. त्यातच, गुलाबी बोंडअळी आल्याने कापसाचे नुकसान झाले.  खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव, घाटपुरी, पळशी बु. या भागातील शेतकऱ्यांच्या कापसाच्या उत्पादनात ५० टक्के घट आली आहे. 
जिल्ह्यातही बहुतांश भागातील शेतकऱ्यांना बोंडअळीमुळे ५० टक्केच उत्पादन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरात आता मोजकाच कापूस शिल्लक राहिला आहे. 
कृषी अधिकाऱ्यांनी फरदडीचा कापूस घेऊ नये, असे आवाहन केले आहे. 
फरदडीचा कापूस घेतला तर बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील वर्षीही कायम राहील तसेच आणखी वाढ होईल, असा इशारा कृषी विभागाने दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी फरदडीचा कापूस घेतला नाही. त्यामुळेही कापसाच्या आवकमध्ये घट झाली आहे. 


चांगल्या प्रतीच्या कापसाला ५९०० रूपये भाव
 मलकापूर येथे चांगल्या प्रतीच्या कापसाला गत दोन दिवसात ५७०० ते ५९०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. 
 बार्शिटाकळी येथे ५६०० ते ५६५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. 
 खामगाव येथे कापसाला प्रतिक्विंटल ५५०० ते ५७०० रूपये दर मिळत आहे. 


कापसाच्या दरात वाढ होत आहे. मलकापूर, खामगाव व बार्शिटाकळीच्या बाजारात कापसाला गत काही दिवसांमध्ये चांगला दर मिळाला. यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे दर वाढले आहे.
- शेख, युनूस, व्यापारी, खामगाव 

Web Title: Traders benefit from cotton price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.