उंद्री येथील व्यापारी गाळे ग्रामपंचायत खाली करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:38+5:302021-09-06T04:38:38+5:30
अमडापूर : उंद्री येथील व्यापारी गाळे खाली करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला आहे़ तसेच गाळे खाली करण्यासाठी पाेलीस ...
अमडापूर : उंद्री येथील व्यापारी गाळे खाली करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला आहे़ तसेच गाळे खाली करण्यासाठी पाेलीस संरक्षण देण्याची मागणी उंद्रीचे ग्रामविकास अधिकारी दीपक गिर्हे यांनी पाेलीस अधीक्षकांकडे केली आहे़ व्यापारी गाळे खाली करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदाेलन करण्यात आले हाेते़
उंद्री येथील ग्रामपंचायतीचे २० वर्षांपासून व्यापाऱ्यांच्या ताब्यात असलेले व्यापारी गाळे खाली करून दुबार लिलाव करून अपंग, बेरोजगार युवकांना देण्यात यावे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या चिखली तालुकाच्या वतीने उपोषण करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीने याबाबत २९ जानेवारी २०२१ला ठराव मंजूर केले होते़ तरीही याबाबत गाळे खाली करण्याची कारवाई ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून करण्यात आली नव्हती़ या करिता राष्ट्रवादी काँग्रेसचे(अल्पसंख्याक विभाग) तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रफिक शेख ,शहर अध्यक्ष राजीक खान यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे ग्रामविकास अधिकारी यांना निलंबनाची मागणी केली होती़ पुन्हा २४ ऑगस्टच्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत व्यापारी गाळे पोलीस संरक्षण घेऊन खाली करण्यात यावे असे ठराव मंजूर झाल्याने ग्रामविकास अधिकारी यांनी पुढाकार घेऊन गाळेधारकांना नोटिसा देऊनसुद्धा दिली़ तरीही गाळे खाली न केल्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पाेलीस अधीक्षकांकडे पाेलीस संरक्षण मागितले आहे़