९ वर्षापासून कावड यात्रेची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 08:25 PM2017-08-08T20:25:11+5:302017-08-09T00:40:34+5:30
मेहकर : गेल्या ९ वर्षापासून मेहकर येथील कावडधारी भक्त श्रावण महिन्यात लोणारच्या धारेचे पाणी आणून मेहकर येथील ओलांडेश्वराला अभिषेक करुन सुख-समृद्धीसाठी साकडे घालतात. शिवभक्त पायदळवारी करुन ९ वर्षापासून ही परंपरा राबवित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

श्रावण महिन्यात शिवभक्त वेगवेगळ्या पद्धतीने देवाला साकडे घालतात.दरवर्षी चांगला पाऊस पडून शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे. तसेच सर्वत्र सुख-समृद्धी नांदली पाहिजे यासाठी मेहकर येथील श्री वाल्मीक शिवभक्त मंडळ, रुद्र तालीम संघ माळीपेठ तसेच माळीपेठ येथील शिवभक्त श्रावण महिन्याच्या तिसºया सोमवारी सकाळी ५ वाजता पायदळ वारी करुन लोणार येथे धारतिर्थाचे पाणी कावडमध्ये भरुन परत पायदळ वारी करुन मेहकर येथे आणून ओलांडेश्वरला अभिषेक करतात. श्री वाल्मीक शिवभक्त मंडळ ही परंपरा ९ वर्षापासून चालवित आहेत. तर रुद्र तालीम संघ व माळीपेठवासी ७ वर्षापासून ही परंपरा राबवित आहेत. श्री वाल्मीक शिवभक्त मंडळाचे नारायण पचेरवाल, अजय जेधे, सागर जेधे, प्रताप गोडाले, मनोज ढंढोरे, किशोर कडुसे, शंकर पचेरवाल, संदीप टाक, दशरथ जेधे, सुनिल ढंढोरे, नंदुसेठ टाक, राजु पचेरवाल, बन्सी गोडाले आदी सहभागी झाले होते.