लोणारात मोकाट जनावरांमूळे वाहतूकीस अडथळा; पर्यटाकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:35 PM2018-07-22T12:35:21+5:302018-07-22T12:37:05+5:30
लोणार : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मोकाट जनावरांचा पर्यटाकांना त्रास वाढला असून पर्यटन नगरीत जनावरे नेहमीच रस्त्यावर बसत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.
लोणार : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मोकाट जनावरांचा पर्यटाकांना त्रास वाढला असून पर्यटन नगरीत जनावरे नेहमीच रस्त्यावर बसत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.
लोणार शहरातील मेहकर- लोणार मार्गावर तसेच सर्व प्रमुख चौकात मोकाट जनावरांची गर्दी होते. अनेक जनावरांचा धक्का लागून दुचाकी तसेच इतर वाहनाचे नुकसान होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोकाट जनावरांमुळे येथे येणारे पर्यटकही त्रस्त झाले आहेत. ही जनावरे दिवसभर शहरात मोकाट फिरतात. स्वच्छ शहर व सुंदर शहर उपक्रमात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून त्यांना ठेवण्यासाठी कोंडवाडाच नसल्यामुळे हा प्रश्न कसा सोडविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोकाट जनावरांच्या वाढत्या संख्येमुळे दुचाकी चालकांना नाहक त्रास होत असून जनावरांच्या धक्क्यामुळे अनेकवेळा अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष संघपाल पनाड यांनी केली आहे.
कोंडवाडा उपलब्ध नसल्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणे शक्य नाही. पंरतु संबधित जनावरांच्या बंदोबस्ताबाबत मालकांना सूचना दिल्या जातील. तसेच कोंडवाडासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
- संगीता साहेबराव पाटोळे, सभापती, न.प.आरोग्य विभाग, लोणार.