पोलिसांचे पथसंचलन
By Admin | Published: September 1, 2014 10:25 PM2014-09-01T22:25:33+5:302014-09-01T22:25:33+5:30
गणेशोत्सव कालावधीत गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत सर्व कार्यक्रम शांततेत व्हावेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.
चिखली : शहरात गणेशोत्सव कालावधीत गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत सर्व कार्यक्रम शांततेत व्हावेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या अटी व बंधनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावे व कायद्याचे पालन करून गणेशोत्सव शांततेत व आनंदाने साजरा करावा, असे आवाहन ठाणेदार व्ही.एच.राजपूत यांनी केले आहे.
२७ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक शामराव दिघावकर, अपर पोलिस अधिक्षक ङ्म्रीमती श्वेता खेडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख, आमदार राहुल बोंद्रे, ठाणेदार व्ही.एच.राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, शांतता कमिटी सदस्य व पत्रकार यांची बैठक पार पडली. तर २८ ऑगस्ट रोजी तहसीलदार राजेश्वर हांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, अभियंता बोरसे, ठाणेदार राजपूत यांनी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन मार्गदर्शन केले तसेच विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे. याशिवाय चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार, निगरानी बदमाश, व इतर गुन्ह्यातील १0९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर गतवर्षी जय गणेश मंडळाची चांदीची गणेश मूर्ती चोरणार्या आरोपींपैकी दोघांविरूध्द कलम १५१ (३) जाफौ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांची बुलडाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. इतर १0 सराईत गुन्हेगारांवर कलम १४४ (२) जाफौ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून गणेशोत्सव काळात पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अवैध दारू विक्री करणार्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून करण्यात आली आहे.