११५ कर्मचा-यांच्या बदल्या
By admin | Published: May 15, 2015 12:58 AM2015-05-15T00:58:18+5:302015-05-15T00:58:18+5:30
बुलडाणा जिल्हा परिषदेत पहिला टप्प्यात समुपदेशनाद्वारे ९६ बदल्या.
बुलडाणा : जिल्हा परिषदेमध्ये सध्या बदल्यांचे वारे वाहात आहे. गुरुवारी पहिल्या टप्पयात विनंती व प्रशासकीय अशा समुपदेशनाद्वारे ९६ बदल्या करण्यात आल्या. यामध्ये विनंतीवरून ५९ तर प्रशासकीय ५६ बदल्यांचा समावेश आहे.
१५ मे २0१४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील गट क व गट ड मधील कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदल्या समुपदेशनाद्वारे १४ आणि १५ मे रोजी करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले होते. त्यानुसार १४ मे रोजी कृषी विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, सिंचन विभाग, पशुसंवर्धन विभाग या विभागाच्या बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटील, समाज कल्याण सभापती बस्सी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजारी यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता शिवाजी सभागृहात समु पदेशनाने बदली प्रक्रियेला सुरूवात झाली. समुपदेशनाची प्रक्रिया दुसर्या टप्प्यातही सुरु राहणार असून, अनेक कर्मचारी सोयीच्या ठिकाणी जागा शोधत आहेत.