बुलडाणा जिल्ह्यातील २८०० शिक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 06:34 PM2018-05-12T18:34:59+5:302018-05-12T18:34:59+5:30
जिल्ह्यातील २ हजार ८०० शिक्षकांच्या बदल्यांचे यादी स्पष्ट झाली असून स्थळ निश्चित करण्यात आले आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : जिल्हापरिषद शिक्षकांच्या बदल्यांचे गुºहाळ गेल्या चार महिन्यांपासून सुरू ॅहोते. शिक्षकांनीही आपल्या सोईनुसार बदली घेण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८०० शिक्षकांच्या बदल्यांचे यादी स्पष्ट झाली असून स्थळ निश्चित करण्यात आले आहे. यात आंतरजिल्हा बदलीमध्ये ५० शिक्षकांचा समावेश असून त्यांना इतर जिल्ह्यात कार्यमुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे प्रकरण वेगवेगळ्या करणामुळे दरवर्षी गाजत आहे. मे २०१६ मध्ये होणाºया जि.प.शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या स्नगनादेशामुळे थांबल्या होत्या. त्यानंतर जून मध्ये जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या. परंतू, यातही जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळेवर अतिरिक्त शिक्षक होते. त्यांनतर २०१७ यावर्षीही जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ निर्माण झाला होता. अतिरिक्त शिक्षकांचा पगार काढणे प्रशासनासमोर अवघड प्रश्न निर्माण झाला होता. एका शाळेवर पाच शिक्षकांची पदे मान्य असताना सहा शिक्षक कार्यरत असल्यास सदर शाळेवरील एका शिक्षकाचे समायोजन करण्यात आले. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातील जवळपास २५० जिल्हा परिषद शिक्षकांचे समायोजन करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या १ मे ते ३१ मे पर्यंत करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून हालचाली सुरू झाल्या होत्या. अनेक शिक्षकांनी आपल्या सोईनुसार बदली होण्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी यांच्यामार्फत अटोकाट प्रयत्नही केले. त्यानंतर शिक्षकांना या बदलीच्या यादीची प्रतीक्षा लागली होती. १२ मे रोजी जिल्हा परिषदला बुलडाणा जिल्ह्यातील बदली होणाºया जि.प.शिक्षकांची यादी धडकल्यानंतर शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. बदली झालेल्या शिक्षकांच्या या यादीमध्ये स्थळही निश्चत करण्यात आले असून जिल्ह्यातील मराठी माध्यम, उर्दू माध्यम, पदविधर शिक्षक यासारख्या सर्व संवर्गातील २ हजार ८०० शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये ५० शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत.
कुठे आनंद तर कुठे नाराजी
जिल्ह्यात जि.प. शिक्षकांच्या बदल्यांची यादी स्पष्ट होताच काही शिक्षकांमध्ये आनंद तर काही शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सोईनुसार बदलीसाठी अनेक प्रयत्न करूनही काहींची बदली दुसºयाच ठिकाणी झाल्याचे चित्रही दिसून येत आहे. बदली प्रक्रिया पुर्ण पारदर्शक झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते; काही शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
इतर जिल्ह्यातून १७२ शिक्षक
बुलडाणा जिल्ह्यातून ५० शिक्षकांच्या बदल्या ह्या इतर जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यांना जिल्ह्या परिषदमधून १२ मे रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर या बदली सत्रामध्ये इतर जिल्ह्यातून १७२ शिक्षक हे बुलडाण्यात आले आहेत. यातील काही शिक्षकांनी स्वत: हुन बुलडाणा जिल्हा मागीतल्याची माहिती आहे. .
सोमवारला होणार प्रक्रिया
बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांची यादी स्पष्ट झाल्यानंतर शनिवार व रविवारला सुट्टी आली. त्यामुळे सोमवारी बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सोमवारपासून २ हजार ८०० शिक्षक नवीन शाळेवर रुजू होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
जिल्ह्यातील २ हजार ८०० जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून ही बदली प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली आहे. तर आंतरजिल्हा बदलीतील ५० शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. बदलीची यादी व स्थळ स्पष्ट झाले असून पुढील प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल.
- एस.टी.वराडे प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.