अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन गरजेचे - विजय पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:22 PM2019-05-04T15:22:14+5:302019-05-04T15:22:43+5:30

अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी  ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.

To transform laughter on the faces of orphans, society needs change - Vijay Patil | अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन गरजेचे - विजय पाटील 

अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन गरजेचे - विजय पाटील 

Next

- राजू चिमणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजातील गरजू, होतकरू, अनाथांना आधार देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. याच भावनेतून पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरांना फाटा देत, त्या खर्चातून गरजू, होतकरू, अनाथांच्या चेहºयावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी  ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.  


आत्मसन्मान फाउंडेशनच्या वाटचालीबद्दल काय सांगाल? 
राज्यातील ग्रामीण भागामध्ये लहान मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतल्या जात असताना त्यांच्या हाताला काम नव्हे तर त्यांच्या हाती पाटी देण्यासाठी आत्मसन्मान जागृत झाला. त्यानंतर सन २०११  पासून शिक्षण सहायता उपक्रमाने मुहूर्तमेढ रोवल्या गेली. पुढे संगणक साक्षरता अभियान, व्यसनमुक्त तरुण  अभियानालाही सुरुवात झाली.  
व्यसनमुक्ती कार्याबाबत काय सांगाल?  
तरुणाईला विविध व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. युवा पिढीमध्ये नवा विचार पेरण्यासाठी त्यांना वास्तविकतेची जाणिव करून देण्यात येत आहे. व्यसनाचा पैसा  वाचवून तो आपण समाजाच्या सत्कार्यासाठी देऊ शकतो, ही  भावना त्यांच्यात निर्माण होणे गरजेचे आहे. सध्या मुक्ताईनगर रोडवर व्यसनमुक्ती केंद्राचे बांधकाम सुरू आहे. येथे कार्यशाळा, शिबिराच्या माध्यमातून युवकांचे मन परिवर्तन करणे सुरू  आहे.   
युवा पिढीला काय संदेश द्याल? 
इंटरनेटच्या जाळ््यात अडकलेल्या तरुणाईने समाजातील वास्तव जाणून घ्यावे. आपल्या वाढदिवसानिमित्त का होईना एक दिवस गरजू, निराधारांसोबत घालवावा. त्या जाणिव जागृतीमधून समाजात आदर्श नागरिक घडून, त्यांचे राष्टÑनिर्मितीमध्ये योगदान राहू शकते. समाजाला नवी दिशा देण्यासाठी तरुणांनी साध्या पद्धतीने लग्न करून विधायक कार्यासाठी पुढाकार घ्यावा.    

 राज्यभरात उपक्रम, व्यापक प्रतिसाद  
शेतकरी कन्या, पुत्र अभ्यासिका सुरू करण्यात आली. यामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. मनोरुग्णांना आधार मिळावा, यासाठी मन परिवर्तन समुपदेशन केंद्रही  सुरू करण्यात आले आहे. सर्वच समाजाचा विविध उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजाची देण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे संस्थेचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बिड, नांदेड, विदर्भातील बुलडाणा, मोताळा, मलकापूर, जळगाव, बुलडाणा तसेच बोरीवली, मुंबई येथेही व्यापक प्रमाणात आत्मसन्मानाची चळवळ रुजली आहे.

Web Title: To transform laughter on the faces of orphans, society needs change - Vijay Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.