राखी पौर्णिमेमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; मुंबईसाठी आता एक हजार रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:13+5:302021-08-22T04:37:13+5:30
राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आता बुकिंगची संख्याही वाढली आहे. शनिवार व रविवार बऱ्याच प्रमाणात गर्दी राहणार असल्याचे सांगण्यात आले, तसेच ...
राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आता बुकिंगची संख्याही वाढली आहे. शनिवार व रविवार बऱ्याच प्रमाणात गर्दी राहणार असल्याचे सांगण्यात आले, तसेच काही बसेसची संख्याही वाढणार आहे.
टॅव्हल्सची संख्या वाढली
१. निर्बंधांच्या काळात प्रवासी मिळत नसल्याने ट्रॅव्हल्सची संख्या मोजकीच होती. आता निर्बंध शिथिल झाले असून, प्रवासी संख्याही वाढली आहे; परंतु खासगी ट्रॅव्हल्सला अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मात्र, राखी पौर्णिमेनिमित्त शनिवार आणि रविवार, अशी दोन दिवस बुकिंग चांगली आहे.
२. बुलडाणा येथून नागपूरसाठी तीन, पुणे १३, सुरत चार आणि मुंबईसाठी तीन ट्रॅव्हल्स सोडण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रॅव्हल्सची ही संख्या अत्यंत कमी होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे.
कोरोनामुळे खासगी ट्रॅव्हल्सला प्रतिसाद मिळत नव्हता. प्रवासी मिळत नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सही कमी सोडण्यात येत आहेत. त्यातच डिझेलचीही दरवाढ झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. आता हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. प्रवासी संख्याही वाढण्याची आशा आहे.
-किशोर कानडजे, ट्रॅव्हल्स मालक
मार्ग आधीचे भाडे आता
बुलडाणा-मुंबई ९५० १०००
बुलडाणा-सुरत ६०० ६००
बुलडाणा-पुणे ७०० ७५०
बुलडाणा-नागपूर ८०० ७५०