ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:36 AM2021-03-23T04:36:32+5:302021-03-23T04:36:32+5:30
कोरोनाआधी रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - २४ सध्याची संख्या - १३ गाडी रुळावर येत होती; पण राज्यात कोरोना ...
कोरोनाआधी रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - २४
सध्याची संख्या - १३
गाडी रुळावर येत होती; पण
राज्यात कोरोना संसर्ग येण्यापूर्वी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय चांगल्या स्थितीत चालत होता. राज्यातील मोठ्या महानगरांमध्ये तर दररोज ३०० ते ५०० हून अधिक ट्रॅव्हल्स धावत होत्या. मात्र, आता कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या शहरांमध्ये, विविध जिल्ह्यांत लॉकडाऊन झाल्याने ट्रॅव्हल्स व्यावसायिक, तिकीट बुकिंग करणारे चालक व वाहक यांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. आत्ता कुठे गाडी रुळावर येत होती, पण आता पुन्हा कोरोनामुळे ट्रॅव्हल्सची चाके मंदावली आहेत.
ट्रॅव्हल्सला नुकतेच चांगले दिवस येत होते. परंतु आता कोरोना वाढत असल्याने पुन्हा प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सची संख्या घटली आहे. बुलडाण्यातून मुंबई, पुणे, नागपूरला जाण्यासाठी पाच ते दहा ट्रॅव्हल्स धावत होत्या. आता ट्रॅव्हल्सची ही संख्या एक ते दोनवर आली आहे. ट्रॅव्हल्सचा हा व्यवसाय कोरोनामुळे पुन्हा एकदा ठप्प पडला आहे.
- नंदकिशोर चाेपडे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक.
बुलडाण्यातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची स्थिती
कोरोनापूर्वी बुलडाण्यातून मुंबईसाठी ४, पुणेसाठी १२, नागपूर ३, सुरत ५ आणि अहमदाबादसाठी ५ ट्रॅव्हल्स धावत होत्या. आता ही संख्या निम्म्याने कमी झाली आहे. सध्या मुंबईसाठी १, पुणेसाठी ८, नागपूर १ आणि सुरतसाठी ३ ट्रॅव्हल्स जातात. अहमदाबादची ट्रॅव्हल्स बंद करण्यात आली आहे.