पशुसंवर्धन दवाखान्यात परिचारकाकडून गुरांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:23 AM2017-09-28T01:23:49+5:302017-09-28T01:23:49+5:30
अमडापूर : स्थानिक पशुसंवर्धन दवाखान्यात कायमस्वरूपी पशुसंवर्धन अधिकारी नसल्यामुळे परिचारकाकडून गुरां-ढोरांवर उपचार करण्यात येत आहेत. याची दखल घेऊन वरिष्ठ अधिकार्यांनी अमडापूर येथील पशुसंवर्धन दवाखान्यात कायमस्वरूपी पशुसंवर्धन अधिकार्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : स्थानिक पशुसंवर्धन दवाखान्यात कायमस्वरूपी पशुसंवर्धन अधिकारी नसल्यामुळे परिचारकाकडून गुरां-ढोरांवर उपचार करण्यात येत आहेत. याची दखल घेऊन वरिष्ठ अधिकार्यांनी अमडापूर येथील पशुसंवर्धन दवाखान्यात कायमस्वरूपी पशुसंवर्धन अधिकार्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
अमडापूरसह १६ गावातील शेतकर्याच्या आजारी गुरा-ढोरांवर औषध उपचार करण्यासाठी शासनाने इमारत बांधून याठिकाणी पशुसंवर्धन अधिकार्याची नियुक्ती केलेली होती; मात्र नियुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सदाशिवन हे ३0 जून रोजी सेवानवृत्त झाले आहेत. तेव्हापासून या पशुसंवर्धन दवाखान्याला डॉक्टर न मिळाल्याने येथील कार्यरत परिचारक हे गुरा-ढोरांवर औषधो पचार करीत असल्याचे दिसत आहे.
या ठिकाणी डॉक्टर नसल्याने उंद्री येथे कार्यरत असलेले डॉ.शु क्ला हे बुधवार व शुक्रवार दोन दिवस काम पाहत असून, इतर दिवशी मात्र परिचारकच पशुसंवर्धन दवाखाण्याची जबाबदारी पार पाडीत आहेत, त्यामुळे या दवाखान्याला पशुसंवर्धन अधिकारी कायमस्वरूपी देण्याची गरज आहे.
चिखली तालुक्यात असलेल्या अमडापूरसह १६ गावातील शे तकरीवर्ग त्यांचे आजारी असलेले गुरे-ढोरे या पशुसंवर्धन दवाखाण्यामध्ये उपचारासाठी घेऊन येतात; मात्र या ठिकाणी गेल्या तीन महिन्यापासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने या आजारी गुरा-ढोरांवर येथील कार्यरत परिचारक हे उपचार करीत आहे. त्यामुळे अनेक वेळा गुरांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. या दवाखान्या व्यक्तिरिक्त परिसरात कोणताच दुसरा दवाखाना नसल्यामुळे पशुपालक अडचणीत आले आहेत. या उपचारादरम्यान ज्याची जबाबदारी आहे, तेच याठिकाणी नसल्याने या परिचारकांनी केलेल्या औषध उपचारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर या ठिकाणी दोन दिवसासाठी उंद्री येथून येणारे डॉ.शुक्ला हे सुद्धा तात्पुरते असल्याने या पशुसंवर्धन दवाखाण्याचा कारभार परिचारकच पाहत आहेत. यासाठी शासनाने कायमस्वरूपी पशुसंवर्धन अधिकारी द्यावा, अशी शे तकर्यांकडून मागणी होत आहे.
डॉ.मोरे ए.डी.ओ.यांचे आदेशाने तात्पुरते बुधवार व शुक्रवार हे दोन दिवस मी उंद्री येथे कार्यरत असताना मला पाहावे लागते व इतर दिवशी परिचारकच काम पाहतात.
- डॉ.जी.एस.शुक्ला
पशुधन पर्यवेक्षक, उंद्री.