अप्रशिक्षीत डॉक्टराकडून होतो उपचार

By admin | Published: July 11, 2014 11:42 PM2014-07-11T23:42:19+5:302014-07-12T00:15:53+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात डॉक्टरांची २0 पदे रिक्त

Treatment done by untrained doctors | अप्रशिक्षीत डॉक्टराकडून होतो उपचार

अप्रशिक्षीत डॉक्टराकडून होतो उपचार

Next

बुलडाणा: जल व किटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असताना बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्या विभागात डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा वार्‍यावर असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अनेक आरोग्य कें द्रांत अप्रशिक्षीत डॉक्टरांकडून उपचार होते असल्याची धक्कादायक माहिती आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात एकून ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट-अ ची एकूण ११८ पदे मंजूर आहेत. मात्र गट-अची आतापर्यंत केवळ ९८ पदे भरण्यात आली आहेत. तर जवळपास २0 वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामुळे त्या परिसरातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर झाली आहे. डॉक्टर नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाही.
शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून सुसज्ज ईमारती उभ्या केल्या आहेत. त्यासाठी लागणारा औषधीसाठा, याशिवाय कर्मचारी, रूग्णवाहिका, ही सर्व सुविधा उपलब्ध असताना केवळ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्याच्या पुरेशा सुविधा मिळत नाहीत.
सद्यस्थितीत पाऊस नसला तरी मागील महिनाभरात वातावरणतील बदलामुळे व दुषीत पाण्यामुळे धाड, रायपूर, सातगाव व अन्य काही गावात सा थीच्या रोगाची लागण झाली होती.
पावसाळ्यात साथ रोग आटोक्यात आणण्याची सगळी भिस्त आरोग्य विभागावर असते. मात्र ज्या प्राथमिक आरोग्या केंद्रावर वैद्यकीय अधिकारीच नाही, त्या परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी शासनानकडे वेळोवेळी पाठपुराव करण्यात आला असल्याचे सांगीतले. लवकरच रिक्त असलेली पदे भरण्यात येतील. पावसाळ्यात साथ रोगाची लागण होऊ नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले.

*अप्रशिक्षीत अधिकारी करतात उपचार
ज्या आरोग्या केंद्रात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरलेले नाहीत, अशा अनेक ठिकाणी अप्रशीक्षीत कर्मचारी काम करतात. हा प्रकार म्हणजे रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. रुग्णालयातील आरोग्य सहाय्यक, चतुर्थश्रेणी कर्मचारी व वेळप्रसंगी आरोग्य केंद्रातील सफाई कामगारही रुग्णाला सलाईन लावण्याचे व इंजक्शन देण्याचे काम करतात. हा प्रकार अनेक आरोग्य केंद्रात सुरू असतो. तर काही आरोग्य केंद्रात आयुर्वेदीक डॉक्टर सेवा देतात. आयुर्वेदीक डॉक्टरांना अँलोपॅथीची प्रॅक्टीस करता येत नाही, असे असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हे डॉक्टर प्रॅक्टीस करीत आहेत.

Web Title: Treatment done by untrained doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.