लाेणार परिसरात झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:14+5:302021-04-28T04:37:14+5:30
मेरा खुर्द फाट्यावरील अतिक्रमण काढले अंढेरा : येथून जवळच असलेल्या मेरा खुर्द फाट्यावरील विश्रामगृहासमाेरील अतिक्रमण प्रशासनाच्या वतीने हटविण्यात आले़ ...
मेरा खुर्द फाट्यावरील अतिक्रमण काढले
अंढेरा : येथून जवळच असलेल्या मेरा खुर्द फाट्यावरील विश्रामगृहासमाेरील अतिक्रमण प्रशासनाच्या वतीने हटविण्यात आले़ या परिसरात अनेक लाेकांनी टिनपत्रे टाकून अतिक्रमण केले हाेते़ पाेलीस बंदाेबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली़
अमडापूर येथे काेविड सेंटर उभारण्याची मागणी
अमडापूर : प्राथमिक आराेग्य केंद्र अमडापूर येथे काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी हाेत आहे़ परिसरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याने काेविड केअर सेंटर उभारण्याची गरज आहे़
बुलडाण्यात हायपाेक्लाेराईडची फवारणी
बुलडाणा : शहरात नगर पालिकेच्या वतीने साेडियम हायपाेक्लाेराईडची फवारणी करण्यात येत आहे़ बुलडाणा शहरात दरराेज काेराेना रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, नगर पालिकेने विविध उपाय याेजना सुरू केल्या आहेत़
घरकूल बांधकामाची रक्कम वाढवा
बुलडाणा : चिखली तालुक्यातील पेठ येथील घरकूल बांधकामाची रक्कम वाढवून देण्याची मागणी लाभार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना समाधान गवई, उमेश जाधव, संतोष धुरंधर यांनी निवेदन सादर केले.
ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती
मोताळा : तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांवरही या आजाराचे सावट पसरले आहे. आरोग्य प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. ग्रामीण भागात कोरोना लसीकरण केल्या जात असले तरी, कोरोनाचा उद्रेक वाढत आहे.
प्रवासी निवाऱ्यांना दुरुस्तीची प्रतीक्षा
दुसरबीड : दुसरबीड परिसरातील अनेक प्रवासी निवाऱ्यांसमाेर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
पक्ष्यांसाठी जलपात्र लावण्याचे आवाहन
मोताळा : तालुक्यातील नागरिकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांसाठी घरावर जलपात्र लावावे, असे आवाहन पक्षिमित्र संघटनेचे तुकाराम चिमकर यांनी केले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे वन्यजीव तसेच पक्ष्यांचे हाल होत आहेत.
जिल्ह्यात कोविड इंजेक्शनचा तुटवडा
मेहकर : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, कोविड-१९ आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अचानक मागणी वाढल्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे दिसून येते.
गोरगरीबांना आर्थिक मदत द्या
सिंदखेडराजा : गोरगरीब आणि दुर्बल घटकातील नागरिकांना कोरोना कालावधीत आर्थिक मदत देण्याची मागणी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी निवेदन सादर केले आहे.
पाझर तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा
चिखली : तालुक्यातील शेलगाव जहागीर येथील पाझर तलावाच्या भिंतीला सायाळ नावाच्या प्राण्याने मोठे भगदाड पडले होते. तथापि, तलावाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढलेली असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सन २०१९ मध्ये स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी केली.
जवानाला मारहाण, एकाविरुद्ध गुन्हा
देऊळगावराजा : माहेरी असलेल्या पत्नीला आणायला सासुरवाडीत आलेल्या लष्करी जवानाला त्याच्या साळ्याने मारहाण केल्याची घटना २२ एप्रिलच्या रात्री देऊळगावराजा येथे घडली. शेलगाव आटोळचे गजानन जोहरे यांच्या तक्रारीवरून देऊळगावराजा पोलिसांनी राहुल डोंगरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.