खामगाव तालुक्यातील चिंचपूर क्षेत्रावरही वृक्ष लागवडीचा बट्टयाबोळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 02:07 PM2018-12-26T14:07:09+5:302018-12-26T14:08:06+5:30
खामगाव/ चिंचपूर : खामगाव तालुक्यातील सामाजिक वनीकरणातंर्गत वृक्ष लागवडीचा ठिकठिकाणी बोजवारा उडाल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव/ चिंचपूर : खामगाव तालुक्यातील सामाजिक वनीकरणातंर्गत वृक्ष लागवडीचा ठिकठिकाणी बोजवारा उडाल्याचे दिसून येते. खामगाव- शेगाव तालुक्यातील शेलोडी-तिंत्रव, जवळाक्षेत्रासोबतच खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथेही कागदोपत्री वृक्ष जगविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. परिणामी, चिंचपूर-प्रिंपी कोरडेपर्यंत शेकडो वृक्ष ‘करपल्याचे’ दिसून येते.
सामाजिक वनीकरण विभाग खामगावतंर्गत चिंचपूर ते पिंप्री कोरडे या साईटवर सन २०१४ ते २०१७ तर दधम ते फत्तेपूर या साईटवर २०१७ ते २०१८ मध्ये करण्यात आलेल्या वृक्षलागवडीत आणि प्रत्यक्ष साईट असलेल्या झाडांच्या संख्येत कमालिची तफावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक ठिकाणी केवळ झाडं लावण्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी वाढ खुंटलेली झाडे आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी तालुका लागवड अधिकाºयांशी संपर्क केला असता, त्यांनी माहिती घेवून सांगतो, असे उत्तर दिले.
सह्या विना काढले पैसे!
लागवड क्षेत्रातील स्थानिक रोजगार सेवक यांना संबंधीत क्षेत्रावर काम देणे अपेक्षीत आहे. तसेच त्यांना यांसंदर्भात इंत्यभूत माहिती देवून त्यांची हजेरी पत्रकावर स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. परंतु चिंचपूर येथील रोजगार सेवकाची एकाही हजेरी पत्रकावर स्वाक्षरी नाही. त्यामुळे हजेरी पत्रकावर स्वाक्षरी न घेताच, पैसे काढल्याचे दिसून येते.
वरिष्ठांचे सातत्यपूर्ण दुर्लक्ष!
खामगाव तालुक्यातील सुमारे ३० साईटवर सन २०१३ ते सन २०१८ या कालावधीत तीस हजारापेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र, ‘हिरवळी’च्या उद्देशाला हरताळ फासत अधिकारी आणि कर्मचाºयांनी कागदोपत्री वृक्ष लावून मलिदा लाटला. वरिष्ठांच्या सातत्यपूर्ण