वृक्ष लागवड लोकचळवळ करावी - फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 12:12 AM2017-07-06T00:12:54+5:302017-07-06T00:12:54+5:30

वसुंधरा फाउंडेशन, वन विभागाच्यावतीने दोन हजार वृक्षांची लागवड

Tree planting should be done - Fundkar | वृक्ष लागवड लोकचळवळ करावी - फुंडकर

वृक्ष लागवड लोकचळवळ करावी - फुंडकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी, हरितक्रांती घडविण्यासाठी व आपली भावी पिढी वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करा, हा उपक्रम हा लोकचळवळ करून आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाचीही परतफेड करा, असे आवाहन राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.
वसुंधरा बहूद्देशीय संस्था तसेच वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनुना तलाव शिवारात दोन हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ ना.फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासह आ.अ‍ॅड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे, उपनगराध्यक्ष मुन्ना पुरवार, जि.प. समाजकल्याण सभापती डॉ.गोपाल गव्हाळे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, उपवन संरक्षक बी.टी. भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Tree planting should be done - Fundkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.