रस्त्यावरील मास्कचे ट्रायल पडते महागात, संसर्गाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 04:07 PM2020-11-09T16:07:47+5:302020-11-09T16:08:50+5:30
कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका वाढत असून, रस्त्यावरील मास्कचे ट्रायल महागात पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी मास्क विक्रीची दुकाने थाटण्यात आलेली आहेत. हे मास्क ग्राहकांकडून ट्रायल म्हणूनही वापरले जातात. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका वाढत असून, रस्त्यावरील मास्कचे ट्रायल महागात पडत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. परंतू नागरिक बिनधास्तपणे बाहेर फिरत आहेत. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्क महत्त्वाचा असून, सध्या रस्त्यावरच मास्क विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. यामध्ये कापडी मास्क, साधे मास्क, एन ९५ नावाचे यासह अनेक प्रकारच्या मास्कची विक्री होत आहे. रस्त्यावरील दुकानांमध्ये मास्क विक्रीतून संसर्गाचा धोका वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्राहक हे मास्क घेण्यापूर्वी तोंडाला लाऊन बघतात, ते पंसत आले नाही, म्हणून पुन्हा त्याच ठिकणी ठेऊन देतात. प्रत्येक ग्राहक त्या मास्कला हाताळत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असतानाही ग्राहकांमध्ये कोरोनाची भीती नाही, का असा प्रश्न उपस्थित होतो.
रस्त्यावरील दुकानात कमी किंमतीत मास्क
रस्त्यावरील दुकानांमध्ये अत्यंत कमी किंमतीमध्ये मास्क मिळत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या दुकानांपेक्षा रस्त्यावर कमी किंमतीत मास्क खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. अगदी ३० रुपयांपासून रस्त्यावरील दुकानांमध्ये कापडी मास्क मिळतात. त्याच मास्कची किंमत ६० ते ८० रुपये आहे.
मास्कचे ट्रायलमधून संसर्गाचा धोका वाढतो. मास्क प्रत्येकाने खरेदी करावा, परंतू तो घरी गेल्यानंतर गरम पाण्याने धुवून दोन तासानंतर त्याचा वापर करावा. विक्रेत्यांनीही काळजी घेतली पाहिजे.
- बाळकृष्ण कांबळे
जिल्हा आराेग्य अधिकारी