आदिवासी आरक्षण कृती समिती लढविणार निवडणूक
By Admin | Updated: September 10, 2014 01:16 IST2014-09-10T01:16:42+5:302014-09-10T01:16:42+5:30
अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात आदिवादी समाजाची निर्णायक मते.

आदिवासी आरक्षण कृती समिती लढविणार निवडणूक
अकोला: विधानसभेच्या आकोट मतदारसंघातून आदिवासी आरक्षण संघर्ष कृती समितीने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संघर्ष कृती समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, बाळापूर आणि आकोट या पाचही मतदारसंघात आदिवादी समाजाची निर्णायक मते आहेत. आतापर्यंत आदिवासी समाजाच्या मतांचा उपयोग केवळ सत्ता उपभोगण्यासाठीच केला गेला. आदिवासी समाज दुर्लक्षितच राहिला. त्यामुळे समाजाच्या हिताचा विचार करणार्या राजकीय पक्षालाच मतदान करण्याचा निर्णय संघर्ष कृती समितीने घेतला आहे. विधानसभेच्या आकोट मतदारसंघात ७२ हजार आदिवासी समाजाची लोकसंख्या ७२ हजार आहे. त्यापैकी ३८ हजार आदिवासी मतदार आहेत. असे असतानाही आतापर्यंत आकोट मतदारसंघातून आदिवासी सामाजाच्या उमेदवाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आकोट मतदारसंघातून आदिवासी आरक्षण संघर्ष कृती समितीने आपला स्वतंत्र उमेदवार उभा करणार आहे. या अनुषंगाने आदिवासी बांधवांनी आढावा घेऊन इतरही मतदारसंघातून उमेदवारी मागावी, असाही निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विविध क्षेत्रात काम करणार्या आदीवासी समाजाच्या संघटनांची एकत्र यावे, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.