आदिवासी महिलांच्या चेहर्यावर फुलले हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:18 AM2017-10-17T00:18:43+5:302017-10-17T00:22:01+5:30
गावाचा काया पालट करण्याची व येथील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याची रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून डॉ. अजित जाधव यांची धडपड. यावर्षी त्यांना साथ मिळाली ती सद्गुरू कलामाई सेवा प्रतिष्ठान शेगाव व सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या दोन संस्थाची.
लोकमत प्रेरणावाट
नानासाहेब कांडलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: तालुक्यातील सोनबर्डी हे निहाल जमातीच्या लोकांची वस्ती असलेले आदिवासी गाव. या गावाचा काया पालट करण्याची व येथील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याची रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून डॉ. अजित जाधव यांची धडपड. यावर्षी त्यांना साथ मिळाली ती सद्गुरू कलामाई सेवा प्रतिष्ठान शेगाव व सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या दोन संस्थाची. दासभार्गव दादा यांनी या गावातील महिलांना दिवाळीनिमित्त साडी-चोळी व फराळ वाटपाचा निर्णय घेतला आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या आदिवासी महिलांच्या चेहर्यावर हास्य फुलले. रविवारी पार पडलेला हा समारंभ अनोखा व तेवढाच अनुकरणीयसुद्धा होता.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ. कृष्णराव इंगळे हे होते. तर आ.डॉ. संजय कुटे यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अपर्णा कुटे यांची विशेष उपस्थिती होती. अ.भा. महिला काँग्रेस कमिटी सरचिटणीस अंजली टापरे, जिल्हाध्यक्ष अँड. ज्योती ढोकणे, माजी नगराध्यक्ष अनिता जयस्वाल, रेड स्वस्तिक सोसायटीचे तालुका अध्यक्ष डॉ. अजि त जाधव, डॉ. उज्ज्वला जाधव, अँड. बाळासाहेब खिरोडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा. नानासाहेब कांडलकर, आदर्श शिक्षक पी.आर. सुलताने, प तंजली योग प्रशिक्षक चतुभरुज मिटकरी, वृक्षप्रेमी अध्यापक विठ्ठल मिरगे, माजी प्राचार्य संतोष भगत, सद्गुरू संत कलामाई सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्रद्धेय दासभार्गव दादा, व्यवस्थापक माईसाहेब येवदेकर, सहयोग शिक्षण मंडळाच्या कोषाध्यक्ष वासं ती हंप्पीहल्लीकर, सदस्य मिलिंद मोहरे यांची प्रमुख उपस्थिती हो ती.
श्री संत गजानन महाराज व योगेश्वरी संत कलामाई यांच्या प्र ितमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने साडी-चोळी वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
१५0 निहाल आदिवासी महिलांना साडी-चोळींचे व दिवाळीच्या फराळाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या महिलांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. दिवाळी जरी गुरुवारी असली तरी सद्गुरू संत कलामाई सेवा प्रतिष्ठान व सहयोग शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने मिळालेली साडी-चोळी व दिवाळी फराळ तसेच रेड स्वस्तिककडून मिळालेला दिवाळी फराळ हा या महिलांसह बालगोपाळांना आनंद देऊन गेला. लहानग्यांनी फराळाचा लगेच आस्वादही घेतला.
आदिवासींच्या आरोग्यासाठी माजी आ. इंगळे करणार सहकार्य
आदिवासी बांधवांमध्ये असलेले अज्ञान व अंधश्रद्धा यावर मात करण्यासाठी आरोग्याची नीगा त्यांनी ठेवली पाहिजे. यासाठी सा तपुडा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माजी आ. कृष्णराव इंगळे हे सहकार्य करणार आहेत. रेड स्वस्तिक व डॉ. अजित जाधव यांनी तसे नियोजन करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
या भावस्पश्री समारंभाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार प्राप्त डॉ. अजित जाधव यांनी केले. यावेळी अपर्णा कुटे, माजी आ. कृष्णराव इंगळे व वासंती हं प्पीहल्लीकर यांनी विचार मांडले. संचालन प्रा. नानासाहेब कांडलकर यांनी केले तर डॉ. गुणवंत फुसे यांनी आभार मानले.
कलामाई प्रतिष्ठान घेणार आदिवासी गाव दत्तक
रेड स्वस्तिक सोसायटीने सोनबर्डी हे गाव आरोग्य, शिक्षण, सामाजिक, उत्थान विविध सहकार्यासाठी दत्तक घेतले असून, याच धर्तीवर सद्गुरू संत कलामाई सेवा प्रतिष्ठान शेगाव व सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई हेसुद्धा जळगाव तालुक्या तील एक आदिवासी गाव दत्तक घेणार असल्याची भावना दासभार्गव यांनी व्यक्त केली.