उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली
By admin | Published: September 20, 2016 12:09 AM2016-09-20T00:09:56+5:302016-09-20T00:09:56+5:30
चिखली येथे नवाज शरीफ यांचा पुतळा जाळला.
चिखली (जि. बुलडाणा), दि. १९: भारतात घुसखोरी करून काश्मीर येथील उरी लष्करी छवणीवर पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले १७ जवानांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी एकत्र आलेल्या कॉग्रेस कार्यकर्त्यांंनी १९ सप्टेंबर रोजी स्थानिक जयस्तंभ चौकात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पुतळा जाळला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, नवाज शरीफ मुर्दाबाद अशा घोषणा देत उरी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
उरी सेक्टरमधील हल्ल्यात मुत्युमुखी पडलेल्या या शहिदांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी चिखली कॉग्रेसच्यावतीने श्रद्धांजली देण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रम झाल्यावर जमा झालेल्या कार्यकर्त्यांंनी जयस्तंभ चौकात घोषणाबाजी करत नवाज शरीफ यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध नोंदविला. यावेळी तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष विष्णू पाटील, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ. सत्येंद्र भुसारी, पं.स.सभापती लक्ष्मणराव आंभोरे, उपसभापती दयानंद खरात, पप्पुसेठ हरलालका, प्रकाश बोंद्रे, कैलास खंदारे, अरविंद देशमुख, समाधान परिहार, साहेबराव पाटील, सुरेश बोंद्रे, गोकुळ शिंगणे, आशिष बोंद्रे, बंडू खरात, तुषार भावसार, डिगांबर देशमाने, काश्मीर चोपडा आदी उपस्थित होते.