अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून युवा शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 07:48 PM2018-12-30T19:48:12+5:302018-12-30T19:48:18+5:30

खामगाव तालुक्यातील कंचनपुर येथील २६ वर्षीय तरुण शेतक-याने अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

Tried for suicides by poisoning a young farmer by poisoning the victim of illegal lenders | अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून युवा शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून युवा शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

खामगाव : खामगाव तालुक्यातील कंचनपुर येथील २६ वर्षीय तरुण शेतक-याने अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. रविंद्र तोताराम खानझोडे असे त्या युवा शेतक-याचे नाव आहे.
खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील पाटील नामक एका अवैध सावकाराकडून २ वर्षाआधी ४ लाख रुपये घेतले होते. अडीच एक्कर शेती गहाण ठेवली होती. मात्र ताबा रविंद्रकडेच होता. ४ लाख आणि ११ लाख रुपये रवींद्र परत करण्यासाठी गेला असता सावकाराने पैसे घेण्यास नकार दिला. आता मला पैसे नकोय शेतीच हवी असं सावकाराने शेतक-याला सांगितलं. रविंद्रने शेती पेरली होती. त्यात पीक उभं असतांना अवैध सावकाराने त्या शेतात येऊन पीक नष्ट केलं. रविंद्र खानझोडे याने विवंचनेत येवून शेतातच विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्यांना प्रथम खामगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
शेतकरी रवींद्र खानझोडे यांनी शनिवारी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नसल्याचे खानझोडे यांच्या नातेवाईकांनी सांगितले. तक्रारीची दखल जर पोलिसांनी वेळीच घेतली असती तर हा प्रकार घडला नसता.

महसूल प्रशासन अनभिज्ञ!
घटनेसंदर्भात उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांना घटनेबाबत कुठलीही माहिती नसल्याचे दिसून आले. गावातील एका शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करतो व महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयाला साधी कल्पनाही नसते याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

अवैध सावकाराला बेड्या ठोका : कैलास फाटे
कंचनपुर येथील रवींद्र खानझोडे या युवा शेतकºयाने याने अवैध सावकाराला कंटाळून विषारी औषध घेतलं आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे अवैध सावकार मुंडके वर काढत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून सावकारावर कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी दिला आहे.

शेतातील तुर कापल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. संबधित शेतक-याने आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
- गजानन भोपळे, बीट जमादार, पोलिस स्टेशन हिवरखेड

Web Title: Tried for suicides by poisoning a young farmer by poisoning the victim of illegal lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.