बुलडाण्यात तिघांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई; अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:50 AM2020-04-17T11:50:01+5:302020-04-17T12:56:41+5:30
तीन पॉझिटिव्ह रुग्णांच्या दुबार चाचणीचे अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आले.
बुलडाणा: कोरोना संसर्गाने पश्चिम वºहाडात पहिला मृत्यू झालेल्या बुलडाणा शहरातील तीन पॉझीटीव्ह रुग्णांनी कोरोना संसर्गाविरोधातील लढाई तब्बल १९ दिवसानंतर जिंकली असून या तिघांनाही सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुटी देण्यात आली. तिघांचेही अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर मेडीकल प्रोटोकॉलमधील सर्व चाचण्यांचे पालन पूर्ण झाल्यानंतरच सुटी देण्यात आली आहे. तब्बल २१ रुग्ण आढळून आल्याने रेड झोन अर्थात हॉटस्पॉटमध्ये गेलेल्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ही मोठी दिलासा देण्यासोबतच आनंददायी बाब म्हणावी लागले. बुलडाणा शहरात २८ मार्च रोजी एका शिक्षकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दुसºया दिवशी त्याचे स्वॅब नमुन्यांचे अहवाल हे पॉझीटीव्ह आले होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांना क्वारंटीन करून स्त्री रुग्णालयामध्ये आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांचे रिपोर्टही पॉझीटीव्ह आले होते. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात त्यानंतर तब्बल दहा क्लस्टर कंटेन्मेंट झोन तयार करावे लागले होते तर जिल्ह्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ही २१ वर पोहोचली होती. निम्मा जिल्हा कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकला होता. या पार्श्वभूमीवर आयसोलेशन कक्षात असलेल्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील तीन व्यक्तींची प्रारंभी १४ दिवसानंतर तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा त्यांची ठरावीक कालावधींनंतर तपासणी करण्यात आली. त्यातही त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. हे रिपोर्ट आल्यानंतर १५ एप्रिल रोजी पुन्हा त्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांचे रिपोर्ट हे तिसºयांदा निगेटीव्ह आले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या या तिघांनाही होम क्वारंटीन रहावे लागले. आगामी जवळपास २८ दिवस त्यांना होम क्वारंटीन रहावे लागले. शुक्रवारी सुटी झालेल्यांमध्ये एक वृद्ध महिला, आणि दोन अल्पवयीन मुले आहेत. कोरोना संसर्गावर त्यांनी जिद्दीने मात केली आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी आणि जिल्हा शल्यचिकित्सक तथा आरोग्य कर्मचाºयांच्या उपस्थितीत या तीनही रुग्णांना सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात आता १७ कोरोना पॉझीटीव्ह
या तिघांना सुट्टी देण्यात आल्याने आता बुलडाणा जिल्ह्यात १७ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण राहले आहेत. यापैकी दोन बुलडाण्यामध्ये, तीन चिखलीमध्ये तीन, देऊळगाव राजा दोन, सिंदखेड राजा एक, मलकापूर चार, खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दोन आणि शेगाव येथे तीन रुग्ण या प्रमाणे या रुग्णांची संख्या आहे. दरम्यान, बुलडाण्यातील एका रुग्णाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रत्यक्षात उपचार करण्यात येत असलेल्या २० रुग्णांपैकी तिघांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्षात आता १७ रुग्ण आयसोलेशन कक्षामध्ये आहेत.