लिंगा पांग्रीकाटे येथे एका जागेसाठी तिहेरी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:39+5:302021-01-13T05:29:39+5:30
साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या लिंगा पांग्रीकाटे ग्रामपंचायतीचे सहा सदस्य अविरोध निवडून आले असून, एका जागेसाठी तिहेरी लढत ...
साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या लिंगा पांग्रीकाटे ग्रामपंचायतीचे सहा सदस्य अविरोध निवडून आले असून, एका जागेसाठी तिहेरी लढत होत आहे.
लिंगा पांग्रीकाटे ग्रामपंचायत ही गट ग्रामपंचायत असून, सात सदस्यसंख्या आहे. सात सदस्य निवडून देण्यासाठी अनेक अर्ज दाखल झाले होते. परंतु निवडणुकीत होणारा खर्च टाळण्यासाठी आणि गावात शांतता राहावी यासाठी साहेबराव काटे महाराज, संतोष चेके, अच्चुतराव थिगळे यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना एकत्र बसवून ग्रामपंचायत निवडणुकीत पांग्रीकाटे येथील सदस्य अविरोध निवडून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी अंबादास भिवसन काटे, नंदा दिनकरराव काटे, किरण रवींद्र काटे, कांताबाई शालिग्राम वाघमारे, शिवाजी लिंबाजी थिगळे आणि लिंगा येथील शरद परमेश्वर चेके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. हे सहाही उमेदवार अविरोध निवडून आले आहेत तर अनुसूचित एका जागेसाठी अशोक भालेराव, मधुकर भालेराव, नितीन भालेराव यांच्यात सरळ लढत होत आहे.