ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

By Admin | Published: October 9, 2016 02:00 AM2016-10-09T02:00:42+5:302016-10-09T02:00:42+5:30

राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघांवर जळगावमध्ये उपचार सुरू.

Truck bikes hit; One killed | ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

googlenewsNext

मलकापूर(जि. बुलडाणा), दि. 0८- भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजता राष्ट्रीय महामार्गावर घडली. जखमींना गंभीर अवस्थेत जळगाव खान्देशकडे नेत असताना वाटेतच एका जखमीचा मृत्यू झाला.
नागपूर येथून एचआर.३८-व्ही२४0१ हा ट्रक भरधाव वेगात व निष्काळजीपणे मुक्ताईनगरकडे जात असताना या ट्रकने मुक्ताईनगरकडून मलकापूर शहराकडे येत असलेल्या एमएच २८-एएच ५३७ या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत अन्वर करीम (वय ४0) रा.कुलमखेल, गुलाबखा इबुखा (वय २५), अफजलखा रशिदखा (वय ३0) दोघे रा.धनगरपुरा (पारपेठ) हे तिघे जण गंभीररीत्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच काँग्रेस तालुकाध्यक्ष अँड.हरीश रावळ, मनसे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर, काँग्रेस शहर अध्यक्ष राजू पाटील, नगरसेवक अनिल बगाडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींच्या नातेवाइकांनी पुढील उपचारासाठी जखमींना जळगाव खान्देशकडे हलविले. दरम्यान, तिघा जखमींपैकी अफजलखा रशिदखा (वय ३0) याचा वाटेतच मृत्यू झाला.

Web Title: Truck bikes hit; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.