ट्रक-बसचा अपघात, १७ प्रवासी जखमी, सहा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:38 AM2021-09-21T04:38:23+5:302021-09-21T04:38:23+5:30
माेताळा : भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने १७ प्रवासी जखमी झाले. यापैकी सहा जण गंभीर आहेत. ही घटना ...
माेताळा : भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने १७ प्रवासी जखमी झाले. यापैकी सहा जण गंभीर आहेत. ही घटना १९ सप्टेंबर राेजी मलकापूर-बुलडाणा मार्गावर माेहेगावजवळ घडली. बाेराखेडी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे उपचारासाठी हलवले.
साेनाळा-बुलडाणा ही बस क्र. एमएच १४ बीटी ४७५७ राजुर घाटासमाेरील माेहेगावजवळून येत हाेती. या वेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक क्र. एमपी ०९ एचएच ५५५० ने बसला जाेरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील १७ प्रवासी जखमी झाले. यापैकी ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तानाजी किसन न्हावकर रा. राजुर, शे. जमील शे. शफी कुरेशी (रा. धावर्डा), कडू राजाराम घुगे, अनुसयाबाई मुरलीधर इंगळे, उषा अशाेक खर्चे , कमल विजय बाठे, मंगला किसन साेनुने, साेफिया सय्यद युनुस, कस्तुराबाई शेषराव गारमाेडे, पवन राजू सुपळकर, काैशल्याबाई कडू सुपळकर, किसन तुकाराम साेनुने आदींचा समावेश आहे. अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला. तसेच बसचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच बाेराखेडी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी २० सप्टेंबर राेजी ट्रकचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.