‘समृद्धी’ वर केमीकल वाहून नेणारा ट्रक पेटला सुदैवाने जिवीत हानी टळली: चालक व सहाय्यक सुखरूप

By निलेश जोशी | Published: August 4, 2023 10:17 AM2023-08-04T10:17:48+5:302023-08-04T10:18:09+5:30

यामध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. मध्यरात्री दरम्यान ही घटना घडली.

Truck carrying chemicals catches fire on 'Samruddhi' Fortunately no loss of life: driver and helper safe | ‘समृद्धी’ वर केमीकल वाहून नेणारा ट्रक पेटला सुदैवाने जिवीत हानी टळली: चालक व सहाय्यक सुखरूप

‘समृद्धी’ वर केमीकल वाहून नेणारा ट्रक पेटला सुदैवाने जिवीत हानी टळली: चालक व सहाय्यक सुखरूप

googlenewsNext

नीलेश जोशी, बुलढाणा

मलकापूर पांग्रा (जि. बुलढाणा)- मध्यरात्री समृद्धी महामार्गावर दुसरबीड नजीक नगर जिल्ह्यातून नागपूर येथे केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे मागील चाक फुटल्याने घर्षण होऊन ट्रकने पेट घेतला. यामध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. मध्यरात्री दरम्यान ही घटना घडली.

सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरमध्ये चायनेज क्रमांक २९८.९ वर हा अपघात झाला. नगर येथून एमएच-१६-सीसी-८७३० हा नगरकडून नागपूरकडे जात होता. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर केमीकलचा साठा होता. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुसरबीड नजीक या ट्रकचे मागील टायर फुटले. त्यामुळे मार्गावर झालेल्या घर्षणामुळे ट्रकने अचानक पेट घेतला. बघता बघता ही आग वेगाने पसरत जाऊन संपूर्ण ट्रक आगीच्या विळख्यात सापडला. ३ ऑगस्ट रोजी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर यांच्या समवेत महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्निश्यामक यंत्रणा तसेच मेहकर तालुक्यातील फर्दापूर येथील पोलिस व यंत्रणा लगोलग घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात रात्रीचा दीड वाजला होता. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

या अपघातामध्ये कोणी जखमी झालेले नाही. ट्रकचा चालक व क्लिनर (सहाय्यक) हे दोघे अपघातानंतर घटनास्थळावरून सुखरुप निघून गेल्याचे महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अपघातग्रस्त ट्रकला सुरक्षीत बॅरिगेटींग करण्यात येऊन रात्री दीड वाजता या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Web Title: Truck carrying chemicals catches fire on 'Samruddhi' Fortunately no loss of life: driver and helper safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.