दाेन ट्रकची धडक, एकजण जागीच ठार, समृद्धी महामार्गावर डोणगावजवळची घटना
By संदीप वानखेडे | Updated: September 25, 2023 17:27 IST2023-09-25T17:27:18+5:302023-09-25T17:27:30+5:30
ही घटना २४ सप्टेंबर राेजी रात्री घडली.

दाेन ट्रकची धडक, एकजण जागीच ठार, समृद्धी महामार्गावर डोणगावजवळची घटना
डाेणगाव : समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर दुसरा ट्रक आदळल्याने उत्तर प्रदेशातील एकजण जागीच ठार झाला. ही घटना २४ सप्टेंबर राेजी रात्री घडली. विरेंद्र पांडे असे मृतकाचे नाव आहे.
समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक २६१ वर ट्रक (क्र. यूपी ६१-टी ७२३५) उभा हाेता. या ट्रकचा चालक मागील बाजूस उभा असतानाच भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने (क्र. एमएच ४८-सीबी ८०३६) जबर धडक दिली. यामध्ये ट्रकच्या मागील बाजूस उभा असलेला चालक विरेंद्र पांडे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे, पोहेकॉ सतीश मुळे, पोकॉ गोविंद खंडागळे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. तसेच प्रेत उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. जखमींना मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास डाेणगाव पाेलिस करीत आहेत.