औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:28 AM2017-11-04T00:28:48+5:302017-11-04T00:29:43+5:30
अंजनी खु. : परिसरातील एका धाब्याजवळ केमिकलने भरलेला ट्रक जळून खाक झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३0 वाजता घडली. या घटनेत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनी खु. : परिसरातील एका धाब्याजवळ केमिकलने भरलेला ट्रक जळून खाक झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३0 वाजता घडली. या घटनेत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले आहे.
लोणार तालुक्यातील अंजनी खु. येथील भूमिपूत्र धाब्याजवळ औरंगाबाद-नागपूर महामार्गावर एमएच ३१ सीबी ८४७८ या क्रमांकाचा ट्रक केमिकल, कटलरी, अत्तराचे सामान घेऊन भिवंडीवरून नागपूरला जाणार होता. दरम्यान, अंजनी खु. येथे रात्री ७.३0 ला अचानक रस्त्यावर चालत्या ट्रकमधून धूर निघत आहे, असे गावकर्यांच्या व ड्रायव्हर सुरेश रामटेके (रा.झिनाबाई टाकळी, नागपूर) यांच्या लक्षात आले. ताबडतोब गाडी थांबवून गावकर्यांनी रस्त्यापासून १00 फूट अंतरावर रिकाम्या शेतामध्ये लावली. तोवर गाडीने पेट घेतला होता. केमिकलच्या डब्ब्यांनी पेट घेतल्याने छोटे-मोठे स्फोट झाले. ट्रकमधून मोठा धूर व ज्वाला दीडशे फुटांपर्यंत वर जात होत्या. गावातील गजानन गायकवाड, कृष्णा खोटे, विलास मुळे, पो.पा. शरद तनपुरे, शंकर तनपुरे, सीताराम बोरकर यांनी मेहकर पोलीस आणि तहसीलदारांना दिली. त्यानंतर मेहकर येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती आटोक्यात आली.
मेहकर पोलिसांनी चौकशी केली असता ट्रक मालकाचे नाव इम्रानखान, आलाखान (कळमना मार्केट नागपूर) हे आहे. ए पीआय पाबळे, एएसआय सोनोने, वायाळ, सानप यांनी वेळीच वाहतूक नियंत्रित केली. या कामात गावकर्यांनी सहकार्य केले.