खामगाव-शेगाव मार्गावर मिनी ट्रकच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:10 AM2018-03-29T02:10:28+5:302018-03-29T02:10:28+5:30
खामगाव : भरधाव मिनी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या दरम्यान शेगाव- खामगाव रोडवर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : भरधाव मिनी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या दरम्यान शेगाव- खामगाव रोडवर घडली.
शेगाव तालुक्यातील चेतन सुरेश चव्हाण (२५ ) हा युवक एम.एच. २८-एए- ६९७ या मोटारसायकलने सगोडाकडे जात होता. दरम्यान, त्याचवेळी पाठीमागून येत असलेल्या एम.एच. ३३-४१५९ च्या मिनी ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवित दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. धडकेत दुचाकीस्वार खाली पडल्यानंतर दुचाकीस्वारास ३० फूट फरपटत नेले. अपघातानंतर मिनी ट्रक चालक घटनास्थळावरून फरार आहे. दरम्यान, अपघातातील दोन्ही पोलिसांनी दोन्ही वाहने पोलीस स्टेशनला जमा केलीत. मृतक कारेगाव हिंगणा येथे पोस्ट मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.
धुळीमुळे अपघातात वाढ!
शेगाव- खामगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. डांबरी रस्त्याच्या दुतर्फा कच्चा रस्ता तयार करण्यात आला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेली काही वाहने मुरूम टाकलेल्या कच्च्या रस्त्यावरून वाहने सुसाट धावतात. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य परसते. मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने समोरील वाहन चालकाला काहीच दिसत नाही. त्यामुळे या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अपघातामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या रस्त्यावरून जाताना वाहन चालक स्पीड लिमिट पाळत नसल्याच्याही अनेकांच्या तक्रारी आहेत.