मेहकर-डोणगाव मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:54 IST2017-12-19T00:53:31+5:302017-12-19T00:54:04+5:30
मेहकर: मेहकरवरून डोणगावकडे जाणार्या दुचाकीला समोरून येणार्या ट्रकने जबर धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी खंडाळा बायपास वर घडली.

मेहकर-डोणगाव मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: मेहकरवरून डोणगावकडे जाणार्या दुचाकीला समोरून येणार्या ट्रकने जबर धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी खंडाळा बायपास वर घडली. शिरपूर जैन तालुका मालेगाव येथील आजादखा पठान (वय ३५) हा आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.-३७/४६२0 ने मेहकर वरून डोणगावकडे जात असताना समोरून येणार्या ट्रक क्रमांक एम.एच.-१८/७८९0 च्या चालकाने आपला ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये आजादखा पठान हा जागीच ठार झाला.यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत. या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असल्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.