जालना-चिखली मार्गावर ट्रक-प्रवासी बसची धडक; चार गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:13 PM2019-05-25T17:13:14+5:302019-05-25T17:13:33+5:30
रोहडा फाट्याजवळ ट्रक व खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत.
लोकमत न्युज नेटवर्क
अंढेरा: जालना-चिखली महामार्गावर अंढेºया नजीक रोहडा फाट्याजवळ ट्रक व खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात २५ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, जखमींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
सध्या जालना-चिखली मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरच अंढेºया नजीक असलेल्या रोहडा फाट्यानजीकच्या वाकानात पुण्यावरून अमरावतीकडे जाणारी राजा कंपनीची खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया बसची (एमएच-०४-एफके-६३९३) आणि जालन्याकडे जाणाºया ट्रकची (आरजे-४७-जीए-१६०२) समोरासमोर जबर धडक झाली. त्यात बस आणि ट्रक चालकासह बसमधील दोन प्रवाशी असे मिळून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांच्या वाहनाद्वारे तत्काळ बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात सकाळी आठ वाजेच्या सुमारास रोहडा फाट्यानजीकच्या एका वळणावर झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही जवळपास पाच ते सहा वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच दुय्यम ठाणेदार व्ही. एल. कवास, बीट जमदार निवृत्ती पोफळे, मांटे, झिने यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठले. सोबतच बसमधील तीनही जखमी आणि ट्रक चालक यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर रस्त्याच्या मधोमधच अपघातग्रस्त ट्रक उभा असल्याने नंतर क्रेनच्या सहाय्याने तो रस्त्याच्या बाजूला हटविण्यात आला व वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामध्ये बस व ट्रकचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. वृत्तलिहीपर्यंत या प्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
जखमीवर बुलडाण्यात उपचार
या अपघातामध्ये खासगी बस चालक बाबाराव मधुकर डव्हळे (४७, रा. गाडगेनगर, अमरावती), अशोक पुंजाजी चांगाडे (५०, रा. कळंबेश्वर(ह.मु. पुणे), पांडुरंग किसन राऊत (४०, रा. सफवा, जि. हिंगोली) आमि ट्रक चालक नथ्तुराम चौधरी (जयपूर, राजस्थान) यांचा समावेश आहे. त्यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुधारक बर्डे यांनी पोलिसाच्या वाहनातून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खासगी बसमधील (स्लीपर कोच) उर्वरित प्रवाशांना किरकोळ इजा वगळता कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही. त्यांना अन्य वाहनाद्वारे निर्धारितस्थळी पाठविण्यात आले. सुदैवाने अपघातानंतर बस रस्त्या लगतच्या झुडपाला अडल्यामुळे मोठे मोठा अनर्थ टळला.