बनावट कागदपत्रांवर शेती हडपण्याचा प्रयत्न!

By Admin | Published: March 9, 2016 02:42 AM2016-03-09T02:42:39+5:302016-03-09T02:42:39+5:30

शेतमालकास दाखवले मृत, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, बनावट दाखला अकोला मनपाचा.

Try to grab farm papers on fake papers! | बनावट कागदपत्रांवर शेती हडपण्याचा प्रयत्न!

बनावट कागदपत्रांवर शेती हडपण्याचा प्रयत्न!

googlenewsNext

शेगाव : लासुरा खुर्द शिवारातील परगावी असलेल्या एका शेतीच्या मालकास मृत दाखवून बनावट कागदपत्नांच्या आधारे शेती हडप करण्याचा प्रकार शेगावात उघडकीस आला असून, याबाबत शेगाव ग्रामीण पोलिसांमध्ये विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात खामगाव येथील एका मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता बळावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथील मो. इस्माईल मुश्ताक अहेमद हे लासुरा खुर्द शिवारातील गट नं.४४ क्षेत्नफळ ४ हे. ९ आर या शेतीचे मालक आहेत. अनेक दिवसापासून येथे राहत नसल्याचा फायदा घेत राजेश मधुकर जाधव, रा.सीतला माता मंदिर, पानट गल्ली, खामगाव याने आठ सहकार्‍यांच्या मदतीने बनावट कागदपत्नाच्या आधारे नोटरीद्वारे सदर शेतीची सौदाचिठ्ठी करून, संगनमत करून फसवणूक केली असा आरोप मो. ईस्माइल यांनी केला. विशेष म्हणजे आपण जिवंत असताना अकोला महानगरपालिकेमधून बनावट मृत्यू दाखला तयार केला. शिवाय माझे भाऊ शकील अहेमद मुश्ताक खान यांचा मृत्यू झाला असून, त्यांना जिवंत दाखवून नोटरीवर खोट्या सह्या व अंगठय़ाचे ठसे घेतले आहेत. माझ्या मृत भावाचे बनावट आधारकार्ड व मतदान काडर्सुद्धा तयार केले आहे. हा सर्व प्रकार आरोपींनी शेती हडप करण्याच्या हेतूने केला असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. याआधारे पोलिसांनी नऊ जणांविरू ध्द अपराध क्रमांक १६/ २0१६ कलम ४१७ ४१८ ४१९ ४२0 ४६५ ४६७ ४६८ ४७१ ४७२ ४७४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पीएसाय कुंटे हे करीत आहे.

Web Title: Try to grab farm papers on fake papers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.