समाज उन्नतीसाठी प्रयत्न करा - सुरेश धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:49 PM2017-09-11T23:49:11+5:302017-09-11T23:49:42+5:30
वडार समाज हा मागासलेला समाज आहे. या समाजात शिक्षणाचा अभाव, गोरगरीब लोक मेहनत करून आपली उपजीविका चालवतात. शासनाकडून या समाजाच्या हितासाठी आतापर्यंत कोणत्याच फायद्याच्या योजना सुरू केलेल्या नाहीत. शासनाच्या विविध योजनांपासून हा समाज वंचित राहिलेला आहे. त्यामुळे आता समाजबांधवांनी जागृत होऊन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: वडार समाज हा मागासलेला समाज आहे. या समाजात शिक्षणाचा अभाव, गोरगरीब लोक मेहनत करून आपली उपजीविका चालवतात. शासनाकडून या समाजाच्या हितासाठी आतापर्यंत कोणत्याच फायद्याच्या योजना सुरू केलेल्या नाहीत. शासनाच्या विविध योजनांपासून हा समाज वंचित राहिलेला आहे. त्यामुळे आता समाजबांधवांनी जागृत होऊन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले आहे.
‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचा जिल्हा मेळावा कृषी वैभव लॉन मेहकर येथे १0 सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी सुरेश धोत्रे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे हे हो ते. तर प्रमुख अतिथी म्हणून ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे सरचिटणीस संतोष मोहिते, प्रदेश संपर्क प्रमुख सुधीर पवार, विदर्भ अध्यक्ष दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते. ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम, बुलडाणा, औरंगाबाद, नांदेड, जालना आदी जिल्हय़ातील वडार समाजबांधवांचा हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी वडार समाजाला आरक्षण मिळावे, जातीचे दाखले वेळेवर मिळावे, गिट्टी खदानसाठी सरकारी जागा मिळावी, २00 ब्रासची रॉयल्टी मोफत मिळावी, आदी महत्त्वाच्या विषयावर मेळाव्यात चर्चा करण्यात आली. यावेळी संतोष मोहिते, सुधीर पवार, दिलीप चव्हाण आदी मान्यवरांनी भाषणे करून समाज जागृतीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन नगर सेवक गणेशअण्णा लष्कर यांनी केले होते. तर सूत्रसंचालन अशोक कुसळकर व आभारप्रदर्शन प्रभाकर मुधोळकर यांनी केले. यावेळी रामेश्वर पिटकर, अशोक मंजुळकर, रमेशअण्णा गायकवाड, शंकर लष्कर, कैलास भांडेकर, अनिल मंजुळकर, संजय अत्तार, माधव जेठे, रमेश लष्कर, राजू डुकरे, अशोक कुसळकर, प्रभाकर मुधोळकर, लक्ष्मण कुसळकर, दिलीप गुंजकर, गणेश मुधोळकर, दत्ता लष्कर, प्रमोद गुंजकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.