ठाणेदाराच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैसे उकळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 11:35 AM2021-06-29T11:35:58+5:302021-06-29T11:36:27+5:30
Cyber Crime News : हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण तळी यांच्या नावाने खोटे फेसबुक अकाउंट उघडल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी अडगाव : तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण तळी यांच्या नावाने खोटे फेसबुक अकाउंट उघडल्याचे समोर आले आहे. या खोट्या अकाउंटवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. त्यांच्या मित्रांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने तळी यांनी खोटे अकाउंट बंद करण्याची विनंती फेसबुककडे केली. आता अकाउंट बंद झाल्याने संभाव्य धोका टळला आहे.
ठाणेदार तळी यांच्या फेसबुक प्रोफाइलवरून फोटो डाऊनलोड करून भामट्याने बनावट फेसबुक खाते उघडले होते. बनावट खाते तयार करणे नंतर फेसबुक मेसेंजरवरून मित्रांना पैशांची विनंती करणे असे प्रकार या माध्यमातून होत असतात. मात्र ठाणेदार तळी यांनी लगेच त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून कुणी पैसे मागत असेल तर पैसे पाठवू नका, असे आवाहन केले.