देशी कट्टय़ाच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न

By admin | Published: December 12, 2014 12:49 AM2014-12-12T00:49:31+5:302014-12-12T00:49:31+5:30

मलकापूर येथील घटना : नागरिकांच्या पुढाकारामुळे आरोपीस पकडण्यात यश.

Trying to steal the land | देशी कट्टय़ाच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न

देशी कट्टय़ाच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न

Next

मलकापूर : देशीकट्टयाचा धाक दाखवून येथील व्यापार्‍याकडून पाच हजार रुपये हिसकून पोबारा करणार्‍या २0 वर्षीय युवकास, संबंधित व्यापार्‍यांची आरडाओरड त्यातून सावध झालेले नागरिक यांच्या मदतीने पोलिसांनी पकडून गजाआड केले. ही घटना स्थानिक सिंधी कॉलनी परिसरात काल १0 डिसेंबरच्या रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली. येथील सिंधी कॉलनीतील रहिवासी शामलाल भगवानदास वाधवाणी (वय ४५) हे त्यांची दुकान बंद करून काल रात्री १0 वाजेच्या सुमारास घराकडे जात होते. तेवढय़ात अज्ञात २0 वर्षीय तरूण आला व त्याने सुनील टॉकीज असलेल्या प्लॉटजवळ शामलाल वाधवाणी यांच्यावर देशीकट्टा रोखून त्यांच्याजवळील पाच हजाराची रक्कम हिसकावून घे तली व त्यानंतर संबंधित युवकाने पळ काढला. या घटनेमुळे शामलाल वाधवाणी यांनी आरडाओरड केली. त्यामुळे जवळपासचे नागरिक गोळा झाले व त्यांनी संबंधित युवकाचा पाठलाग करुन त्याला पकडण्यात यश मिळविले. यावेळी संबंधित युवकाने गोळी झाडण्याचाही प्रयत्न केला. मात्र देशी कट्टयात ह्यतीह्ण गोळी अडकल्याने अनर्थ टळला. यानंतर एकत्र आलेल्या नागरिकांनी त्यास चांगलाच चोप दिला व याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक वळवी, सपोनि गवारगुरू, पोहेकाँ मापारी, पोकाँ म्हस्के, तय्यबअली, कर्‍हाळे आदिंची तुकडी घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी नागरिकांच्या मदतीने आरोपी युवकास देशी कट्टयासह ताब्यात घेवून गजाआड केले. सुमारे ३0 मिनीटे या प्रकारामुळे सिंधी कॉलनीत एकच थरार निर्माण झाला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी शामलाल वाधवाणी यांच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आलेला युवक रामकिशोर शंकर गुप्ता (वय २0) रा.दस्तुरनगर अमरावती याच्याविरूध्द कलम ३९२ भादंवि ३, २५ ऑर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सद्या गजाआड असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Title: Trying to steal the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.